AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KBC मध्ये एक कोटी जिंकलेली कोल्हापूरच्या कविता चावलांसाठी 7.5 कोटींचा प्रश्न?

या शोमध्ये मिळालेल्या पैशातून त्या त्यांचा मुलगा विवेकच्या शिक्षणासाठी खर्च करणार आहेत. आपल्या मुलाने परदेशात शिक्षण घेऊन देशाचे नाव रोशन करावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

KBC मध्ये एक कोटी जिंकलेली कोल्हापूरच्या कविता चावलांसाठी 7.5 कोटींचा प्रश्न?
KBC , Kavita chawla Image Credit source: Tv9
प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Sep 20, 2022 | 10:58 AM
Share

सोनी टीव्हवरील प्रसिद्ध क्विझ रिअॅलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती 14’ (Kaun Banega Crorepati -14)ला सद्या चांगलाच चर्चेत आहे. 14  व्या सिझनमधील या ‘शो’ला पहिला करोडपती मिळाला आहे. महाराष्ट्रातील कोल्हापुरात राहणाऱ्या कविता चावला (Kavita Chawla)यांनी एक कोटी रुपयांवर आपले नाव कोरले आहे. मात्र, आता शोची ही करोडपती महिला स्पर्धक एक कोटीच्या पुढच्या भागात म्हणजेच 7.5 कोटी रुपयांसाठी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)यांनी विचारलेल्या प्रश्नाला योग्य उत्तर देते की 1 कोटी रुपये घेऊन शो सोडणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

कोण आहेत कविता चावला

केबीसीमध्ये एका कोटी जिंकणाऱ्या कोल्हापूरची कविता चावला या गृहिणी आहेत. त्यांनी स्वतः त्यांचा मुलगा विवेक याला पहिली ते आठवीपर्यंत शिकवले आहे. आपल्या मुलाला शिकवताना त्यांनी स्वतः कौन बनेगा करोडपतीची तयारी केली. त्यांच्या जिद्दीने आणि आवडीने त्यांना अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉटसीटवर आणले. या शोमध्ये मिळालेल्या पैशातून त्या त्यांचा मुलगा विवेकच्या शिक्षणासाठी खर्च करणार आहेत. आपल्या मुलाने परदेशात शिक्षण घेऊन देशाचे नाव रोशन करावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

जिंकण्याचा आत्मविश्वास

तिसर्‍यांदा नशिबाने तिला संधी दिली तेव्हा कविताने ठरवले होते की ती एक कोटी रुपये जिंकल्यावरच या शोमधून जाणार आणि म्हणून हॉटसीटवर बसल्यावर त्यांनी  जाहीर केले की त्या एक कोटी रुपये जिंकणार आहेत. त्यांचा आत्मविश्वास पाहून अमिताभ बच्चनही थक्क झाले. या शोमध्ये मुलगा विवेक व कुटुंबीयही त्यांच्या सोबत उपस्थित असलेले दिसून आले आहे.

Follow Us
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा