माधुरी दीक्षितच्या गाण्यावर 73 वर्षीय आजींचा भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ
73 वर्षीय छोबी यांच्या आत्मविश्वासाला सलाम... माधुरी दीक्षित हिच्या गाण्यावर भन्नाट डान्स... पाहा व्हिडीओ..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त 73 वर्षीय आजींच्या दमदार डान्सची चर्चा.... व्हिडीओ अनेकांना केलं प्रेम व्यक्त...

मुंबई | 20 मार्च 2024 : कोणतीही गोष्ट करायची असल्यास सर्वात आधी तर मनाची तयारी लागते. जर मी हे केलं तर लोकं काय बोलतील… असा विचार केल्यास आपण जगणं विसरून जावू… अशात काही व्यक्ती असतात ज्या कोणताच विचार न करता फक्त मला माझी आवड जोपासायला आवडत आहे आणि ती जोपासणार… फक्त जिद्द मनात ठेऊन काही व्यक्त आयुष्यात पुढे जाण्याचा विचार करतात. अशात एका 73 वर्षीय आजींचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सध्या ज्या आजी बाईंची चर्चा रंगली आहे. त्यांचं नाव छोबी असं आहे. त्यांनी अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या गाण्यावर भन्नाट डान्स केला. ‘डान्स दिवाने’ शोमध्ये छोबी यांनी दमदार एन्ट्री करत धकधक गर्लच्या ठेका धरला. डान्स सुरु झाल्यानंतर छोबी म्हणतात, हैं ‘माधुरी जी स्वागत नहीं करोगी हमारा…’, त्यानंतर त्यांचा डान्स पाहून प्रत्येकाला प्रचंड आनंद झाल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.
View this post on Instagram
सध्या सर्वत्र छोबी यांच्या डान्स व्हिडीओची चर्चा रंगली आहे. छोबी यांचा डान्स पाहिल्यानंतर शोचे जज सुनिल शेट्टी आणि माधुरी दीक्षित देखील हैराण होतात. छोबी यांनी दिग्दर्शक संजय लिला भंसाळी यांच्या ‘देवदास’ सिनेमातील ‘हम पे ये किसने हरा रंग डाला’ गाण्यावर ठेका धरला… व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
छोबी यांचा डान्स पाहिल्यानंतर हैराण झालेल्या माधुरी हिने देखील त्यांच्यासोबत ठेका धरला. पुढे छोबी यांचं कौतुक करत माधूरी म्हणाली, ‘तुम्ही आम्हाला खरं तर जगायला शिकवलं आहे. जे मनात आहे ते करा… घाबरु कधीच नका…’, छोबी यांच्या व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
माधुरी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री फक्त उत्तम अभिनेत्री नाहीतर, नृत्यांगना देखील आहे. माधुरी हिने कथक या शास्त्रीय नृत्याचं प्रशिक्षण घेतलं आहे. अभिनेत्री कायम सोशल मीडियावर स्वतःच्या डान्सचे व्हिडीओ पोस्ट करत असते. आज माधुरी बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
