AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठी व्यक्तीला प्रवेश देऊ नये,या शहरावर आपले वर्चस्व.. प्रसाद वेदपाठकच्या पोस्टवर वादग्रस्त रिप्लाय

सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये एका व्यक्तीने मराठी माणसाबाबत वादग्रस्त वक्कव्य केले आहे. त्याच्या वक्तव्याचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मराठी व्यक्तीला प्रवेश देऊ नये,या शहरावर आपले वर्चस्व.. प्रसाद वेदपाठकच्या पोस्टवर वादग्रस्त रिप्लाय
Prasad VedpathakImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 11, 2026 | 12:42 PM
Share

घाटकोपरमधील एका सोसायटीत जैन साध्वींसाठी मारलेल्या पांढऱ्या पट्टीचा मुद्दा सध्या चांगलाच जोर धरुन आहे. गेल्या काही दिवसांपासून ही मुद्दा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, कंटेंट क्रिएटर आणि युट्यूबर प्रसाद वेदपाठकने सोशल मीडियावर याबाबत पोस्ट शेअर केली होती. त्याच्या सोसायटीत जैन कुटुंबियांनी कुणाचीही परवानगी न घेता पांढरी पट्टी मारली होती. यामुळे प्रसाद, त्यांची पत्नी आणि आई यांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा दावा प्रसाद वेदपाठकने केला होता. आता त्याच्या या पोस्टवर एका व्यक्तीने दिलेल्या उत्तराने सर्वत्र खळबळ माजली आहे.

प्रसाद वेदपाठकच्या सोसायटीमधली ही पांढरी पट्टी हटवण्यात आली असल्याचे स्वत: प्रसादने सांगितले होते. त्याने “माझ्यासाठी हा प्रश्न संपला…”, अशा आशयाची पोस्ट करुन पांढरी पट्टी हटवल्याचा व्हिडीओ शेअर केला होता. आता प्रसाद वेदपाठकच्या पोस्टवर काही जैन धर्मीय आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. सध्या या व्यक्तीच्या पोस्टचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Post

त्या व्यक्तीची पोस्ट काय?

श्रमण नावाच्या ट्विटर हँडलवरुन प्रसाद वेदपाठकचं ट्वीट रिट्वीट करण्यात आले आहे. “आपण जैनांनी मुंबईत केवळ जैनांसाठीच असलेल्या स्वतंत्र वसाहती (सोसायट्या) उभारल्या पाहिजेत आणि त्यामध्ये कोणत्याही मराठी व्यक्तीला प्रवेश देऊ नये. आपण त्यांना दाखवून दिले पाहिजे की या शहरावर आपले वर्चस्व आहे आणि आपणच इथले सर्वेसर्वा आहोत… दिगंबर आणि श्वेतांबर अशा दोन्ही पंथांमधील जैन बिल्डरांनी या उपक्रमाची सुरुवात करावी आणि त्याचा विस्तार प्रत्येक शहरात करावा…” असे या पोस्टमध्ये लिहिले गेले आहे.

सोशल मीडियावर ‘अजिंठा’ नावाच्या पेजनं या वादग्रस्त पोस्टचा स्क्रिनशॉर्ट शेअर केला आहे. तसेच, स्क्रिनशॉर्ट शेअर करताना त्यांनी, “हा ह्यांचा खरा चेहरा आहे.” जैन ओन्ली सोसायट्या तयार करून मराठी लोकांना हाकला”, म्हणतोय हा गडी. मुंबईवर राज्य करणार म्हणतोय. अरे शहरावर राज्य करायला तू स्वतःला डॉन नंबर वन सुर्याभाई समजतोय की काय? गावागावात जैनओन्ली सोसायट्या बनवण्यापेक्षा तू एक स्वतंत्र देश जैनिस्थान बनवून त्यातच शिफ्ट का नाही होत? त्या देशातले रस्ते काळ्या डांबराऐवजी पांढऱ्या फेव्हीकॉलने बनवून घे. आम्ही काही म्हणणार नाही…” असे म्हटले आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा