AR Rahman: ए. आर. रहमान यांच्या मुलीचा निकाह; पहा कोण आहे जावई?

ए. आर. रहमान (AR Rahman) यांची मुलगी खतिजा रहमानचा (Khatija Rahman) नुकताच निकाह पार पडला. रियासदीन शेख मोहम्मदशी (Riyasdeen Shaik Mohamed) तिचं लग्न पार पडलं.

AR Rahman: ए. आर. रहमान यांच्या मुलीचा निकाह; पहा कोण आहे जावई?
ए. आर. रहमान यांच्या मुलीचा निकाह
Image Credit source: Instagram
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

May 06, 2022 | 9:34 AM

भारतीय संगीत विश्वाचा बादशहा म्हणून ओळखले जाणारे ए. आर. रहमान (AR Rahman) यांची मुलगी खतिजा रहमानचा (Khatija Rahman) नुकताच निकाह पार पडला. रियासदीन शेख मोहम्मदशी (Riyasdeen Shaik Mohamed) तिचं लग्न पार पडलं. रहमान यांनी सोशल मीडियावर या निकाहचा फोटो पोस्ट केला असून त्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. या फोटोमध्ये रहमान त्यांच्या कुटुंबीयांसोबत पहायला मिळत आहेत. ‘तुम्हा दोघांवर देवाचा सदैव आशीर्वाद असो, शुभेच्छांसाठी तुम्हा सर्वांचे आभार आणि प्रेम’, असं कॅप्शन देत त्यांनी हा फोटो पोस्ट केला आहे. खतिजाचा पती रियासदीन हा ऑडिओ इंजीनिअर आहे. रहमान यांच्या या फॅमिली फोटोमध्ये नवविवाहित खतिजा आणि रियासदीन सोफ्यावर बसले आहेत. त्यांच्यासोबत रहमान यांची दुसरी मुलगी रहीमा, पत्नी सायरा बानू आणि त्यांचा मुलगा अमीन हे रहमान यांच्यासोबत मागे उभे आहेत.

संगीत विश्वातील अनेक दिग्गजांनी या फोटोवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. ‘संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा’ अशी कमेंट गायिका हर्षदीप कौरने लिहिली. तर गायिका श्रेया घोषालने खतिजा आणि रियासदीनला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘या सुंदर जोडीवर देवाचा सदैव आशीर्वाद राहो’, असं तिने लिहिलंय. खतिजानेही तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नाचा फोटो पोस्ट करत आनंद व्यक्त केला आहे. गायिका निती मोहन, चिन्मयी श्रीपदा यांनी त्यावर कमेंट्स करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

पहा फोटो-

 

View this post on Instagram

 

A post shared by ARR (@arrahman)

 

View this post on Instagram

 

A post shared by 786 Khatija Rahman (@khatija.rahman)

खतिजा आणि रियासदीन यांचा जानेवारी महिन्यात साखरपुडा पार पडला. या कार्यक्रमातील बरेच फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. यावेळी तिने गुलाबी आणि चंदेरी रंगसंगतीचे कपडे परिधान केले होते. वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत खतिजानेही संगीत विश्वात करिअर करण्याचा निर्णय घेतला. तीसुद्धा संगीतकार आणि गायिका आहे. क्रिती सनॉनची मुख्य भूमिका असलेल्या ‘मिमी’ या चित्रपटातील ‘रॉक अ बाय बेबी’ हे गाणं तिने गायलं आहे.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें