अंकिता लोखंडे प्रेग्नंट, अभिनेत्याचा मोठा खुलासा, अभिनेत्रीच्या घरी लवकरच बाळाचे…

अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने अभिनय क्षेत्रामध्ये अत्यंत मोठा काळ गाजवला आहे. अंकिता लोखंडे ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते. कायमच चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. आता अंकिता लोखंडे हिच्याबद्दल अत्यंत मोठा बातमी येताना दिसत आहे.

अंकिता लोखंडे प्रेग्नंट, अभिनेत्याचा मोठा खुलासा, अभिनेत्रीच्या घरी लवकरच बाळाचे...
Ankita Lokhande
| Updated on: Aug 23, 2024 | 2:13 PM

अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने फक्त टीव्ही मालिकांमध्येच नाही तर चित्रपटांमध्येही धमाकेदार भूमिका या केल्या आहेत. अंकिता लोखंडे ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्यासोबत बरेच वर्ष रिलेशनशिपमध्ये होती. मात्र, एका वाईट कळणावर अंकिता लोखंडे हिचे ब्रेकअप झाले. सुशांत सिंह राजपूत याच्यासोबतच्या ब्रेकअपनंतर अंकिता लोखंडे हिने विकी जैन याला डेट केले आणि त्याच्यासोबत लग्न केले. विकी जैन हा मोठा बिझनेसमॅन आहे. अंकिता लोखंडे ही काही दिवसांपूर्वीच विकी जैन याच्यासोबत बिग बॉसमध्ये सहभागी झाली होती. मात्र, यावेळी दोघांमध्ये जोरदार वाद बघायला मिळाला.

आता अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे लाफ्टर शेफमध्ये सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे धमाकेदार गेम खेळताना दिसत आहेत. अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या लग्नाला आता तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. आता लवकरच अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या घरी पाळणा हालणार असल्याचे सांगितले जातंय. अंकिता प्रेग्नंट असल्याचे सांगितले जातंय.

लाफ्टर शेफच्या सेटवरील एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सर्व टीम गप्पा मारताना दिसत आहे. सोशल मीडियावर ऑफ कॅमेरा शूट झालेला व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये अली गोनी हा म्हणताना दिसतोय की, छोटा जैन येत आहे किंवा छोटी येत आहे…अली गोनी याचे हे बोलणे ऐकून विकी जैन हा लाजताना दिसत आहे.

हा व्हिडीओ पाहून सांगितले जाते की, अंकिता लोखंडे ही प्रेग्नंट आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वचजण विचारत आहेत की, खरोखरच अंकिता लोखंडे ही प्रेग्नंट आहे का? अली गोनी याचे हे बोलणे ऐकून अंकिता लोखंडे हिचे चाहते आनंदी झाल्याचे बघायला मिळतंय. लोक सतत याबद्दल सोशल मीडियावर प्रश्न विचारताना दिसत आहेत.

अंकिता लोखंडे ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसत आहे. अंकिता लोखंडे ही सतत खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसत आहे. हेच नाही तर अंकिता लोखंडे हिने तिच्या घरी रक्षाबंधनचा खास कार्यक्रम देखील ठेवला होता. अंकिता लोखंडे हिच्या घरी भारती सिंह तिच्या मुलाला आणि पतीला घेऊन पोहोचली होती.