AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जया बच्चन यांचा ‘तो’ अंदाज पाहून लोक हैराण, व्हिडीओ व्हायरल, यावेळी चक्क..

Jaya Bachchan Video : जया बच्चन या कायमच चर्चेत असतात. जया बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. जया बच्चन यांनी मोठा काळ हा चित्रपटांमध्ये गाजवला आहे. जया बच्चन अभिनयासोबतच राजकारणात देखील चांगल्याच सक्रिय दिसतात. जया बच्चन यांचे काही व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात.

जया बच्चन यांचा 'तो' अंदाज पाहून लोक हैराण, व्हिडीओ व्हायरल, यावेळी चक्क..
| Updated on: Mar 04, 2024 | 4:29 PM
Share

मुंबई : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे प्री वेडिंग सेलिब्रेशन जामनगरमध्ये पार पडले. या प्री वेडिंग फंक्शनसाठी बाॅलिवूडचे जवळपास सर्वच कलाकार हे पोहचले. आता या प्री वेडिंग फंक्शनचे काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. अंबानींच्या या पार्टीत बाॅलिवूड कलाकार हे चांगलीच धमाल करताना दिसत आहेत. काहींनी तर थेट डान्स देखील या प्री वेडिंग फंक्शनमध्ये केले. फक्त बाॅलिवूड कलाकारच नाही तर विदेशातूनही काही खास पाहुणे हे या प्री वेडिंग फंक्शनसाठी पोहचले होते. तीन खानचा धमाकेदार डान्स देखील बघायला मिळाला.

प्री वेडिंग फंक्शनमध्ये दीपिका पादुकोण ही पती रणवीर सिंह याच्यासोबत डान्स करताना देखील दिसली. बाॅलिवूडचे जवळपास सर्वच कलाकार हे या प्री वेडिंग फंक्शनमध्ये पोहचले. हे कलाकार 1 ते 3 मार्चपर्यंत गुजरातमध्येच मुक्कामी होते. मात्र, बच्चन कुटुंबिय हे 3 मार्चला प्री वेडिंग फंक्शनच्या शेवटच्या दिवशी जामनगरमध्ये दाखल झाले.

विशेष म्हणजे प्री वेडिंग फंक्शनसाठी, अमिताभ बच्चन, जया बच्चन, श्वेता बच्चन, ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन, नव्या नवेली नंदा, अगस्त्य नंदा आणि आराध्या बच्चन हे पोहचले. यावेळी अंबानींच्या पार्टीत बच्चन कुटुंब धमाल करताना दिसले. हेच नाही तर ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या डान्सचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ हा तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये अंबानींच्या पार्टीतून बच्चन कुटुंब बाहेर पडताना दिसतंय. यावेळी जया बच्चन या सर्वात अगोदर पुढे येताना दिसत आहेत. हेच नाही तर पहिल्यांदाच पापाराझी यांच्याकडे पाहून स्माईल देताना जया बच्चन या दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून सर्वचजण हैराण झाले.

जया बच्चन या पापाराझी यांच्यावर चिडताना नेहमीच दिसतात. शक्यतो त्या फोटोसाठी पोझ देखील देत नाहीत. पहिल्यांदाच असे घडले असावे की, जया बच्चन यांनी पापाराझी यांच्याकडे पाहून स्माईल दिली. आता या व्हिडीओवर लोक मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. अनेकांनी म्हटले की, हा खरोखरच मोठा चमत्कारच म्हणावा लागेल. हा व्हिडीओ तूफान व्हायरल होतोय.

जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.