AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या घरात जेवणात बनतात ‘हे’ खास पदार्थ, पाहा संपूर्ण मेनू…

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ही कायमच चर्चेत असणारी जोडी आहे. विशेष म्हणजे कायमच स्पॉट होताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे त्यांच्या नवीन घराचे बांधकाम पाहण्यासाठी पोहोचले होते. याचे काही फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या घरात जेवणात बनतात 'हे' खास पदार्थ, पाहा संपूर्ण मेनू...
Ranbir Kapoor and Alia Bhatt
| Updated on: Sep 06, 2024 | 4:11 PM
Share

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ही बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत राहणारी जोडी आहे. काही वर्ष एकमेकांना डेट करत यांनी अचानक लग्न केले. यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या मुलीचे नाव राहा असून तिचे फोटो व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे त्यांच्या नवीन घराचे बांधकाम पाहण्यासाठी काही दिवसांपूर्वीच राहा हिला घेऊन पोहोचले होते. अत्यंत आलिशान असे घर कपूर कुटुंबियांचे मुंबईमध्ये बांधणे सुरू आहे. बांधकाम पाहण्यासाठी कायमच आलिया आणि रणबीर कपूर हे पोहोचतात.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यास चाहत्यांना कायमच आवडते. आता रणबीर कपूर आणि आलिया यांच्या घरात जेवणामध्ये दररोज काय पदार्थ असतात, याबद्दल मोठा खुलासा झालाय. याबद्दलचा एक व्हिडीओच सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय.

द प्रायव्हेट शेफ्स क्लबचे शेफ सूर्यांश सिंग कंवर यांनी आलिया आणि रणबीरसाठी काम केले आणि त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव देखील इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत सांगितला आहे. रणबीर आणि आलियाच्या घरी दररोज कोणते पदार्थ बनवले जातात याचाही खुलासा करण्यात आलाय. 

सूर्यांशने एक पोस्ट शेअर केलीये. त्यामध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचेही फोटो दिसत आहेत. यासोबतच त्यांच्या घरात बनवलेल्या पदार्थांचे फोटोही शेअर करण्यात आले. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या घरात विविध पदार्थ जेवणात बनत असल्याचे बघायला मिळतंय. आता हीच पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. 

चाहते हे या पोस्टवरच मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. एकाने लिहिले की, खरोखरच असे आयुष्य पाहिजे राव…इतके सारे पदार्थ घरी तयार करून खाण्यास मिळतात. दुसऱ्याने लिहिले की, फोटोमध्ये दिसणारे सर्व पदार्थ चांगले दिसत आहेत. आता ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत  आहे.

Follow Us
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे उद्या घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर..
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर प्रकरणात काय बोलणार?
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन
Video : दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन, पाणी कपातीचे संकेत
संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल
Video: प्रदीप पूर्णेकर प्रकरण... संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल, 'जिथे राजकारण दिसतं तिथेच राऊत का जातात?'
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची...
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची भीती, धमक्यांचा दावा...
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
पप्या शिंदे खंडणी विरोधी पथकात, आईची पहिली प्रतिक्रिया समोर; पुरणेकर..
Pradeep Purnekar Case | अटकेत असलेला आरोपी पप्या शिंदेला खंडणी विरोधी पथकात आणलं, आता...