AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीचा ‘या’ व्यक्तीने वाचवला जीव, निघाली होती स्वतःला संपवायला

जेव्हा ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीला आयुष्यात सर्वकाही संपल्या सारखं वाटलं... तिने केलं स्वतःला संपवण्याचा प्रयत्न... पण एका व्यक्तीमुळे अभिनेत्रीच्या आयुष्यात झाले मोठे बदल... मुलाखतीत स्वतः अभिनेत्रीने केला वाईट दिवसांचा खुलासा...

‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीचा 'या' व्यक्तीने वाचवला जीव, निघाली होती स्वतःला संपवायला
| Updated on: Oct 28, 2023 | 11:37 AM
Share

मुंबई : 28 ऑक्टोबर 2023 : सर्वसामान्य व्यक्ती असो किंवा सेलिब्रिटी प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक वेळ येते जेव्हा सर्वकाही संपलं आहे… असे अनेक विचार डोक्यात येतात आणि मन निराश होतं. अशा वेळी कोणासोबत बोलावं, कोणाकडे मन मोकळं करावं काहीही कळत नाही… अखेर स्वतःला संपवावं अशी भावना निर्माण होते. शेवटचा श्वास घेण्याची भावना मनात आल्यानंतर अनेक जण स्वतःला संपवण्याचा निर्णय देखील घेतात. असंच काही झालं आहे एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीसोबत… सध्या द्या अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे ती, दुसरी तिसरी कोणी नसून ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री अश्विनी महांगडे…

नुकताच झालेल्या मुलाखतीत अश्विनी महांगडे हिने तिच्या आयुष्यातील वाईट दिवसांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘प्रत्येकाच्या आयुष्यात एक अशी वेळ येते जेव्हा सर्व काही संपलं आहे… असं वाटतं. माझ्या आयुष्यात देखील अशी वेळ आली होती. आयुष्यात किती संकटांचा सामना करावा लागेल असं वाटत होतं. म्हणून स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला होता…’

अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘मीरारोड याठिकाणी एक तलाव आहे. मी तलावाजवळ जावून बसली. स्वतःला संपवण्याचा विचार माझ्या डोक्यात होता, तेव्हा त्याठिकाणी नाना आले आणि माझ्या बाजूला बसले.. मी खूप रडत होती… त्यांनी देखील मला रडू दिलं… त्यानंतर डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, ‘शांत झाली का आता…”

‘नाना शेजारी येवून बसले असताना देखील माझं रडू थांबत नव्हतं. तेव्हा मला त्यांनी एक गोष्ट सांगितली, परम्यातम्याने तुला याठिकाणी काहीतरी उत्तम करण्यासाठी पाठवलं आहे आणि तुझ्याकडून ते अद्याप झालेलं नाही. मग अशी याठिकाणाहून तुझी सुटका होणार नाही… म्हणून तू थांब…’

नानांनी दिलेले समज अश्विनी हिने लक्षात ठेवली आणि झगमगत्या विश्वात स्वतःचं नाव मोठं केलं.. तेव्हा अभिनेत्री जवळ तिचे नाना असल्यामुळे अश्विनी हिची जीव वाचला… सध्या सर्वत्र अश्विनी हिची चर्चा रंगत आहे.

अश्विनी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या अश्विनी ‘आई कुठे काय करते’ मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. मालिकांमध्येच नाही तर, अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. ‘महाराष्ट्र शाहीर’ आणि ‘बॉईज’ सिनेमात देखील अश्विनी महत्त्वाची भूमिका साकारली होती.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत