AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आई तुळजाभवानी’ मालिकेत स्त्रीशक्तीचा जागर; आई तुळजाभवानीचा अद्वितीय दृष्टिकोन येणार समोर

'आई तुळजाभवानी' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. या मालिकेच्या माध्यमातून स्त्रियांना खास संदेश देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे बालगणेशाच्या अनेक लीला या मालिकेत पहायला मिळत आहेत.

'आई तुळजाभवानी' मालिकेत स्त्रीशक्तीचा जागर; आई तुळजाभवानीचा अद्वितीय दृष्टिकोन येणार समोर
'आई तुळजाभवानी' मालिकेचं कथानक रंजक वळणावरImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 05, 2025 | 12:59 PM
Share

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘आई तुळजाभवानी’ या मालिकेत आता बाल गणेशाच्या अनेक लीला बघायला मिळणार आहेत. ज्यामधून पुढे त्यांचं कुटुंब एकत्र येणार आहे. पण हे करत असताना बालगणेश वडिलांच्या सांगण्यावरून आपल्या गावी परत जाण्याचा विचार करतात. मात्र देवी भवानीशंकर यांना सांगण्याचा प्रयत्न करते की गणेश एकटा जाणार नाही आणि आपल्यात झालेल्या वादाचा राग त्याच्यावर काढू नये. दुसरीकडे अशोकसुंदरीच्या मदतीने गणेश एक वाडा बांधण्याची कल्पना मांडतो, पण देवी स्पष्ट शब्दांत नाकारते. पद्महंसा जेव्हा या नकारामागील कारण विचारते, तेव्हा देवी तुळजाभवानी अत्यंत सुंदररित्या तिचा दृष्टिकोन समोर मांडते.

तिचं म्हणणं आहे की, “स्त्रीला कुठल्याही लोकात तिच्या स्थानासाठी संघर्ष हा करावा लागतोच. ते असं कोणालाच दिलं जात नाही, ते आपण स्वतःच निर्माण करायचं असतं. स्त्री ही केवळ आई, पत्नी, मुलगी नाही, तर ती स्वतः एक शक्ती आहे. पण जोपर्यंत ती स्वतःचं स्थान ओळखत नाही, तोपर्यंत समाज तिला परावलंबी ठरवतो. कुटुंब ही आपली जबाबदारी आहे, पण स्वतःचं अस्तित्व विसरणं हा त्याग नाही तर ती एक चूक आहे. कारण जी स्वतःला विसरते, तिचं अस्तित्वही जग विसरतं. स्त्रीला कोणत्याही चौकटीत अडकवायचं नाही. तिने स्वतःचं विश्व निर्माण करायचं, स्वतःचा मार्ग निवडायचा. स्वतःच्या सन्मानासाठी उभी राहायचं. कैलासात तर माझं घर आहे पण घरासाठी मी पृथ्वीवर आले नसून इथे स्थानासाठी आलो आहोत. हा अवतार घेण्यामागे एक कारण आहे.”

यातून आताच्या स्त्रीला अतिशय सुंदर असा संदेश देण्यात आला आहे जो प्रत्येक स्त्रीने आत्मसात करायलाच हवं. आता ही गोष्ट पुढे कशी जाणार, कसं देवीला स्वतः चं स्थान मिळणार हे मालिकेच्या आगामी भागात पहायला मिळेल. दुसरीकडे, बालगणेश तुळजा आणि महादेव यांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठीच गणेश देवीकडे येऊन परिसराबद्दल विचारतो आणि देवी तुळजाभवानी रूपात त्याला परिसर दाखवायला निघते.

अशोकसुंदरी महादेवांना एका अंधाऱ्या गुहेतील कुंडाबद्दल सांगून त्यांना मूळ रूपात सोबत येण्यास राजी करते. परिसर दाखवताना देवी एक अनोळखी गुहा पाहून आश्चर्यचकित होते. गणेश आपल्या वाकचातुर्यचा उपयोग करत आई तुळजाला त्या गुहेत एकटी पाठवण्यात यशस्वी होतो. तर दुसरीकडे, महादेव गुहेपाशी आल्यावर गणेशाला कैलासावर न परतण्याबद्दल विचारतात. गणेश गुहा पाहण्याचा आग्रह धरतो, गणेश आपल्या या युक्तीमध्ये यशस्वी होईल का, महादेव आणि आई तुळजा यांची अखेर भेट अखेर होणार का, याविषयीची उत्कंठावर्धक कथा प्रेक्षकांना ‘आई तुळजाभवानी’ या मालिकेत दररोज रात्री 9 वाजता पहायला मिळेल.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.