‘आई तुळजाभवानी’ मालिकेत अनोखं वळण; देवी तुळजाभवानीला भवानीशंकरांची खरी ओळख पटणार?

'आई तुळजाभवानी' या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय. ही मालिका दररोज रात्री 9 वाजता कलर्स मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

| Updated on: Jan 23, 2025 | 10:05 AM
'कलर्स मराठी' वाहिनीवरील 'आई तुळजाभवानी' या मालिकेत अनेक घटना घडत असतानाच देवीने शाकंभरीच्या रुपात दर्शन दिलं आणि सृष्टीचं महत्त्व सांगितलं. तर दुसरीकडे देवीच्या हाकेला ऐकून काळभैरव भूतलावर प्रकटले आहेत.

1 / 6
देवी आपलं अढळ स्थान शोधण्याची जबाबदारी भैरवाला देते. या आठवड्याच्या उत्तरार्धात तुळजाभवानी आणि भवानीशंकर यांच्या नात्यातील रुसवे-फुगवे, नात्यातील गोड क्षण बघायला मिळणार आहेत. त्यांच्यातला समज–गैरसमजाचा गुंता अधिक वाढत जात असून भवानीशंकर रूपात पृथ्वीवर निवास करणाऱ्या महादेवांना देवी ओळखणार का? हा रंजक कथाभाग उलगडत आहे.

2 / 6
देवींची कन्या अशोकसुंदरीला आलेला भवानीशंकराबद्दलचा संशय वाढू लागला आहे. पण, महादेवांना देखील आई तुळजाभवानीसमोर खऱ्या रुपात येण्याची आतुरता लागून राहिली आहे.

3 / 6
तर दुसरीकडे श्रृंगीचे पृथ्वीवर आगमन झाल्यावर साऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. पण, श्रुंगी महाराजांचं असं अचानक पृथ्वीवर येण्याचं नेमकं कारण काय असेल? याचा खुलासा हळूहळू होईलच.

4 / 6
भैरवाला देवीने अढळ स्थान शोधण्याची दिलेल्या जबाबदारीत अधेमधे जाणवणारे शिवतत्व यामुळे देवीचा संशय बळावला असून देवींना सत्य समजल्यावर त्यांची नेमकी प्रतिक्रिया काय असेल, त्यांच्या रागात भर पडेल का? की कुटुंब एकत्र आल्याचा आनंद असेल? हा अत्यंत उत्कंठावर्धक कथानकाचा प्रवास मालिकेत पहायला मिळणार आहे.

5 / 6
हे विशेष कथानक शनिवारी २5 जानेवारीपर्यंतच्या आई तुळजाभवानीच्या भागात दिसणार आहे. मानवीरूपात देवांनाही भोगांना सामोरं जावं लागणं हा कथेचा विषय जितका अनोखा तितकाच आदिशक्तीच्या या रचनेपाठची लीला ही आवर्जून जाणून घेण्यासारखी आहे

6 / 6
Follow us
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?.
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग.
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले.
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर.
दिल्लीत कांटे की टक्कर, आपचे तीन मोठे चेहरे पिछाडीवर
दिल्लीत कांटे की टक्कर, आपचे तीन मोठे चेहरे पिछाडीवर.
बीडचे SP कॉवत ॲक्शन मोडवर, पोलीस अधीक्षकांची 80 जणांना तंबी, कारण काय?
बीडचे SP कॉवत ॲक्शन मोडवर, पोलीस अधीक्षकांची 80 जणांना तंबी, कारण काय?.
तब्बल 'इतक्या' लाख लाडक्या बहिणी अपात्र, आदिती तटकरेंनी थेट दिला आकडा
तब्बल 'इतक्या' लाख लाडक्या बहिणी अपात्र, आदिती तटकरेंनी थेट दिला आकडा.
कोर्टाचा निर्णय येताच दमानियांची मोठी मागणी, करूणा शर्मांना तातडीने...
कोर्टाचा निर्णय येताच दमानियांची मोठी मागणी, करूणा शर्मांना तातडीने....
लोकलमधून उतरताना ओढणी दुसऱ्याच्या बॅगेत अडकली अन्..., बघा CCTV फुटेज
लोकलमधून उतरताना ओढणी दुसऱ्याच्या बॅगेत अडकली अन्..., बघा CCTV फुटेज.
'त्या काय मला न्याय देणार?' शर्मांची महिला आयोगाच्या अध्यक्षांवर टीका
'त्या काय मला न्याय देणार?' शर्मांची महिला आयोगाच्या अध्यक्षांवर टीका.