AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nawazuddin Siddiqui च्या संसारात अडचणी; पत्नी म्हणाली ‘माझे पती दिसतात तसे पण…’

Nawazuddin Siddiqui याच्या अडचणीत मोठी वाढ, 'माझे पती दिसतात तसे पण...' असं म्हणत पत्नी आलिया सिद्दीकी हिने खासगी आयुष्याबद्दल केले मोठे खुलासे

Nawazuddin Siddiqui च्या संसारात अडचणी; पत्नी म्हणाली 'माझे पती दिसतात तसे पण...'
| Updated on: Feb 25, 2023 | 2:04 PM
Share

Aaliya Siddiqui On Nawazuddin : अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी (nawazuddin siddiqui) आणि पत्नी आलिया सिद्दीकी (aaliya siddiqui) यांच्यातील वाद आता टोकाला पोहोचला आहे. सर्वत्र अभिनेत्याच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चा रंगत आहेत. आलिया सतत नवाझुद्दीन सिद्दीकी याच्यावर गंभीर आरोप करताना दिसत आहे. नुकताच आलियाने नवाझुद्दीन सिद्दीकी याच्यावर बलात्काराने आरोप करत तक्रार दाखल केली. पतीवर बलात्काराची तक्रार दाखल केल्यानंतर आलियाने मुलाखतीत खासगी आयुष्याबद्दल अनेक मोठे खुलासे केले आहेत. सध्या आलिया आणि नवाझुद्दीन सिद्दीकी त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. आलियाच्या आरोपांनंतर नवाझुद्दीन सिद्दीकीच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

एका मुलाखतीत आलिया हिला विचारलं, नवाझुद्दीन सिद्दीकी याच्यासोबत असलेल्या संबंधांना बलात्कार असं का म्हणते? यावर आलिया म्हणाली, ‘आम्ही कधीही लिव्हइन रिलेशनशिपमध्ये नव्हतो. आम्ही पती – पत्नी होतो. आम्ही तीन महिले रिलेशनशिपमध्ये होतो. आम्ही एकदा आमच्या नात्याला संधी दिली. पण नवाझुद्दीन सिद्दीक याला वाटलं की मुलांसाठी आपल्याला पुन्हा एकत्र यायला हवं.’

मुलाखतीत आलियाने नवाझुद्दीन सिद्दीकी याच्यासोबत घटस्फोटाबद्दल देखील वक्तव्य केलं. आलिया म्हणाली, ‘नवाझुद्दीन याने घटस्फोटासाठी न्यायालयात काही कागदपत्र जमा केली आहेत. आता न्यायालया त्यावर निर्णय घेईल.’ आलियाने नवाझुद्दीन याला घटस्फोटासाठी अर्ज दिला नसून फक्त नेटीस पाठवली आहे. असं देखील आलिया म्हणाली. (nawazuddin siddiqui wife)

पुढे आलिया म्हणाली, ‘मी नवाझुद्दीन याला कधी समजू शकली नाही, कारण तो दिसतो तसा नाही.’ जेव्हा आलिया, नवाझुद्दीन याच्याकडे मुलीच्या दुबईमध्ये राहण्याबद्दल बोलायला गेली होती तेव्हा शेवटचं नवाझुद्दीनचं पत्नीसोबत बोलणं झाल्याचं देखील आलियाने मुलाखतीत सांगितलं. तेव्हा नवाझुद्दीनने पत्नी आलिया हिला वाईट वागणूक दिली होती. असं देखील आलिया म्हणाली.

दोन मुलांना देखील आलिया हिच्यासोबत रहायचं आहे. मुलांबद्दल आलिया म्हणाली, ‘पिता काय असतो हे देखील मुलाला माहिती नाही. मुलाला नवाझुद्दीन याचा सहवास देखील माहिती नाही. जेव्हा दुबईमध्ये नवाझुद्दीन काही महिन्यासाठी मुलांसोबत होता, तेव्हा मला फोन यायचा की, तो मुलांना वेळ देत नाही. जेव्हा आम्ही एकत्र रहायचो तेव्हा देखील नवाझुद्दीन कायम पाहुण्यासारखा घरी यायचा…’ असं देखील आलिया म्हणाली. (nawazuddin siddiqui family)

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच