Aamir Khan : हंगामा है क्यू बरपा…कपिलचं गाणं ऐकून आमिर खान झाला नि:शब्द, व्हिडीओ व्हायरल

मि. परफेक्शनिस्ट आमिर खानने नुकतीच कपिल शर्मा आणि इतर सेलिब्रिटींची भेट घेतली. कपिलनेही त्याच्यासोबतचे काही फोटो शेअर केले होते. त्याच्या एका कृतीमुळे आमिर नि:शब्द झाल्याचा व्हिडीओ समोर येत आहे.

Aamir Khan : हंगामा है क्यू बरपा...कपिलचं गाणं ऐकून आमिर खान झाला नि:शब्द, व्हिडीओ व्हायरल
Image Credit source: instagram
| Updated on: Jun 06, 2023 | 5:49 PM

मुंबई : बॉलिवूडचा मि. परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) आणि कपिल शर्मा (Kapil Sharma) यांची काही दिवसांपूर्वी भेट झाली होती. इंडस्ट्रीतील मित्र आणि सहकाऱ्यांसोबत ती एक आनंदी संध्याकाळ होती. कपिलने त्याच्या इन्स्टाग्रामवर आमिरसोबतचे काही फोटोही शेअर केले आणि एका सुंदर संध्याकाळ घालवल्याबद्दल त्याचे आभार मानले. त्याच संध्याकाळच्या एका मैफिलीचा एक सुरेख व्हिडीओ समोर आला आहे. अभिनेत्री अर्चना पूरण सिंह यांनी एक व्हिडीओ शेअर केला असून त्यात कपिलच्या सुरेल आवाजातील गीतही ऐकायला मिळत आहे.

यावेळी अर्चना पूरण सिंह यांच्यासह कविता कौशिक आणि इतरही उपस्थित होतेत्या. त्या मैफिलीत कपिलने नेहमीप्रमाणे त्याच्या सुरेल गायकीने काही संस्मरणीय आणि आयकॉनिक गाणी सादर केली. अर्चनाने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला असून त्यामध्ये आमिर खान हा आमिर खान कपिलच्या गाण्याचा आनंद घेत असल्याचे दिसत आहे. तो आणि उपस्थित असलेले इतर सर्व जण त्याच्या गाण्यात रमले, गुंग झाले. कपिलच्या अवीट गोडीच्या आवाजाने आमिर खान तर नि:शब्द झाल्याचे व्हिडीओत दिसत आहे.

आमिरने लुटला गाण्याचा आनंद

लाल सिंग चड्ढा रिलीज झाल्यापासून आमिर खान लो प्रोफाइल ठेवत आहे. त्याने चित्रपटांमधून देखील काही काळासाठी घेतला आहे आणि आजकाल तो मित्रांना भेटत आहे. असंच काही दिवसांपूर्वी आमिर हा कपिल शर्मा, अर्चना पूरण सिंग आणि इतरांना त्याच्या निवासस्थानी भेटला होता. अभिनेता होस्ट बनला होता आणि त्याने मित्रांसह मैफिलीचा आनंद घेतला. ती प्रत्येकासाठी संस्मरणीय संध्याकाळ होती.

 

अभिनेत्री अर्चना पूरण सिंह देखील बऱ्याच वर्षांनी आमिरला भेटली. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये कपिल शर्मा हा गुलाम अली यांचे ‘ हंगामा है क्यों बरपा’ हे गाणं सुरेल आवाजात सादर करताना दिसत आहे. आमिर खान कपिल शर्माच्या संगीताचा आनंद घेताना दिसत आहे. बाकी सर्वांनीही या म्युझिकल नाईटचा आनंद घेतला.

कपिल शर्माने तो क्षण इतक्या सुंदरपणे टिपल्याबद्दल अर्चनाचे आभार मानले. ती एक सुरेख आणि सुरेल संध्याकाळ असल्याचे कपिलने नमूद केले.

 

काही दिवसांपूर्वीच आमिर खान आणि कपिल शर्मा दोघेही गिप्पी गरेवालच्या ‘कॅरी ऑन जट्टा 3’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी उपस्थित होते. त्यावेळी आमिरने कपिलचे कौतुक करत आपण त्याचा शो आवडीने पहात असल्याचे नमूद केले होते.