AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2026 Schedule : शेड्यूलमध्ये मोठा बदल, भारत सेमीफायनलमध्ये पोहोचल्यास सामने कुठे होणार? ICC चा मोठा निर्णय

T20 World Cup 2026 New Schedule : टी20 वर्ल्ड कप 2026 दरम्यान आयसीसीने सेमीफायनल मॅचच्या वेन्यू संदर्भात नवीन गाइडलाइन्स जारी केली आहे. त्यानंतर शेड्यूलमध्ये मोठा बदल पहायला मिळतोय. कुठली टीम क्वालिफाय करणार त्यावर सुद्धा हा बदल अवलंबून आहे.

T20 World Cup 2026  Schedule : शेड्यूलमध्ये मोठा बदल, भारत सेमीफायनलमध्ये पोहोचल्यास सामने कुठे होणार? ICC चा मोठा निर्णय
T20 World Cup 2026
| Updated on: Feb 24, 2026 | 8:35 AM
Share

T20 World Cup 2026 New Schedule : टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये सध्या सुपर-8 राऊंडचे सामने सुरु आहेत. यानंतर नॉकआऊटच्या मॅचेस होतील. यात दोन सेमीफायनल आणि एक फायनल आहे. हे सर्व मोठे सामने आहेत. आयसीसीने त्या संदर्भात एक निर्णय घेतला आहे. त्यामुळे टुर्नामेंटच्या शेड्यूलमध्ये बदल पहायला मिळू शकतो. कुठली टीम सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार आणि कोणाचा सामना कोणाबरोबर होईल यावर सुद्धा हा बदल अवलंबून आहे. इंटरनॅशनल क्रिकेट काऊन्सिलने अलीकडेच सेमीफायनलच्या वेन्यू बद्दल गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. यात कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर महत्वाची भूमिका आहे.

त्यानुसार श्रीलंकेला घरच्या मैदानावर सेमीफायनलचा सामना खेळण्याची संधी मिळू शकते. भारत आणि श्रीलंका यंदाच्या टी20 वर्ल्ड कपचे यजमान आहेत. सेमीफायनलसाठी हायब्रिड मॉडेल स्वीकारण्यात आलं आहे. त्यानुसार सामना भारतात कोलकाता, मुंबई आणि त्याशिवाय श्रीलंकेत कोलंबोमध्ये होऊ शकते. खासकरुन पहिल्या सेमीफायनलची स्थिती फ्लोटिंग आहे. कोलंबो किंवा कोलकता या दोनपैकी एका ठिकाणी सेमीफायनल खेळवण्याचा निर्णय होऊ शकतो.

श्रीलंका-भारत सेमीफायनलमध्ये असतील तर सामना कुठे होईल?

आयसीसीनुसार, जर पाकिस्तानची टीम सेमीफायनलमध्ये पोहोचली तर ते आपला सामना 4 मार्चला कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळतील. पाकिस्तानी टीमने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला नाही आणि श्रीलंकेने क्वालिफाय केलं तर तर श्रीलंका भारत वगळता अन्य कुठल्याही टीम विरुद्ध कोलंबोमध्येच सेमीफायनलचा सामना खेळू शकते. पाकिस्तानच्या सेमीफायनल आणि फायनल मॅचसाठी श्रीलंकेला प्राधान्य असेल असं टुर्नामेंट आधीच आयसीसीने जाहीर केलं होतं. आता श्रीलंकेची टीम सेमीफायनलमध्ये पोहोचली तर भारत सोडून अन्य कुठल्याही टीम विरुद्ध ते मायदेशात खेळू शकतात. जुन्या शेड्यूलनुसार श्रीलंकन टीमला भारतात सेमीफायनलचा सामना खेळावा लागणार होता. पण आता आयसीसीने काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.

भारतात सेमीफायनलसाठी कुठल्या वेन्यूंची निवड?

भारत सेमीफायनलमध्ये पोहोचल्यास मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दुसरा सेमीफायनलचा सामना होईल. पण तीच सेमीफायनल मॅच पाकिस्तान विरुद्ध असल्यास सेमीफायनल कोलंबोला जाऊन खेळावी लागेल. पाकिस्तान आणि श्रीलंका दोन्ही टीम्स सेमीफायनलमध्ये पोहोचल्या नाहीत तर पहिला सेमीफायनल सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स आणि दुसरा मुंबईत होईल.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...