AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑनस्क्रीन मुलीच्या निधनानंतर कुटुंबीयांच्या भेटीला पोहोचला आमिर खान

आमिर खानच्या 'दंगल' या चित्रपटात भूमिका साकारलेली अभिनेत्री सुहानी भटनागरच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. सुहानीवर दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात डर्माटोमायोसिटीस या आजाराशी संबंधित उपचार सुरू होते. मात्र शरीरात पाणी भरल्याने तिचं वयाच्या 19 वर्षी निधन झालं.

ऑनस्क्रीन मुलीच्या निधनानंतर कुटुंबीयांच्या भेटीला पोहोचला आमिर खान
Aamir KhanImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 24, 2024 | 1:45 PM
Share

फरीदाबाद : 24 फेब्रुवारी 2024 | आमिर खानच्या ‘दंगल’ या चित्रपटात बालपणीच्या बबिता फोगाटची भूमिका साकारणारी सुहानी भटनागरचं वयाच्या 19 व्या वर्षी निधन झालं. दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात तिच्यावर डर्माटोमायोसिटीस (Dermatomyositis) या आजाराशी संबंधित उपचार सुरू होते. दोन महिन्यांपूर्वीच तिला याची लक्षणं जाणवली होती. सुहानीच्या डाव्या हाताला सूज आल्यानंतर या आजाराचं निदान झालं होतं. अनेक डॉक्टरांनी तिच्या या आजारामागचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र अद्याप त्यांना यश मिळालं नाही. आता आमिर खान सुहानीच्या कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी फरीदाबादमधल्या तिच्या निवासस्थानी पोहोचला आहे. आमिरने सुहानीच्या आईवडिलांची भेट घेतली आणि आपल्या ऑनस्क्रीन मुलीला श्रद्धांजली वाहिली. त्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये आमिर खानसोबत सुहानीचे कुटुंबीय उभे असल्याचं पहायला मिळतंय. सुहानीच्या फोटोसमोर तिचे वडील, आई आणि भाऊ आमिरसोबत उभे आहेत. सुहानीच्या प्रार्थनासभेत खुद्द बबिता फोगाटसुद्धा पोहोचली होती. बबिताने सोशल मीडियाद्वारेही सुहानीला श्रद्धांजली वाहिली होती. सुहानीच्या आजारपणाबद्दल आमिरला कोणतीच कल्पना नव्हती.

“आमिर सर नेहमी तिच्या संपर्कात होते. ते खूप चांगले आहेत. सुहानीच्या आजारपणाबद्दल आम्ही त्यांना सांगितलं नव्हतं. कारण आधीच आम्ही त्यामुळे चिंतेत होतो. आम्ही त्याविषयी कोणालाच माहिती दिली नव्हती. आम्ही जर त्यांना एक मेसेज जरी पाठवला असता तरी लगेच ते मदतीला धावून आले असते. सुहानीला ओळखत असल्यापासून त्यांची चांगली मैत्री झाली होती. आम्हाला त्यांच्या मुलीच्या लग्नाचं आमंत्रणसुद्धा मिळालं होतं. इतकंच नव्हे तर स्वत: आमिर सरांनी फोन करून लग्नाला बोलावलं होतं”, असं सुहानीची आई पूजा भटनागर म्हणाल्या होत्या.

“या इंडस्ट्रीमध्ये आमची जी काही ओळख आहे, ती सुहानीमुळेच आहे. ती खूप हुशार होती आणि प्रत्येक काम उत्तम करण्याची जिद्द तिच्यात होती. मात्र हाताला सूज आल्यानंतर तिची सर्व स्वप्नं अधुरी राहिली. सुरुवातीला हा फक्त त्वचेचा आजार आहे असं आम्हाला वाटलं होतं. आम्ही तिला काही डर्मटोलॉजिस्टकडेही घेऊन गेलो होतो, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. दिल्लीतल्या एम्समध्ये दाखल केल्यानंतर तेला डर्माटोमायोसिटीस असल्याचं निदान झालं होतं. मात्र उपचारादरम्यान तिला संसर्ग झाला आणि शरीरात पाणी भरलं”, अशी माहिती तिच्या आईने दिली.

सुहानीच्या निधनाविषयी कळताच आमिर खान प्रॉडक्शन्सकडून सोशल मीडियावर पोस्ट लिहिण्यात आली होती. या पोस्टद्वारे सुहानीच्या निधनाविषयी शोक व्यक्त करण्यात आला होता. 2016 मध्ये ‘दंगल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.