बॉलिवूडमध्ये पाकिस्तानच्या विरोधात सर्वात आधी मीच…, आमिर खानचा मोठा दावा

Aamir Khan On Palistan: आमिर खान पाकिस्तान विरोधात काहीच बोलत नाही? आमिर खान याने केलाय मोठा दावा... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आमिर खान याच्या वक्तव्याची चर्चा...

बॉलिवूडमध्ये पाकिस्तानच्या विरोधात सर्वात आधी मीच..., आमिर खानचा मोठा दावा
फाईल फोटो
| Updated on: Jun 15, 2025 | 9:24 AM

Aamir Khan On Palistan: बॉलिवूड अभिनेता आमिर खान याने नुकताच झालेल्या मुलातीत अनेक मोठे खुलासे केले आहेत. शिवाय पाकिस्तानबद्दल देखील अभिनेत्याने मोठा दावा केलाय. नुकताच झालेल्या एका कार्यक्रमात आमिर खान याला एक प्रश्न विचारण्यात आला. ‘तू सिनेमात कधी पाकिस्तानचं नाव का घेत नाही?’ याचं कारण सांगत अभिनेत्याने फक्त मोठा खुलासा नाही तर, कारण देखील सांगितलं. सरफरोश भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिला सिनेमा होता, ज्यामध्ये पाकिस्तान आणि त्याची गुप्तचर संस्था आयएसआय यांचे उघडपणे नाव घेण्यात आलं होतं. आमिर म्हणाला की, सेन्सॉर बोर्डामुळे सिनेमा निर्मात्यांना बऱ्याच काळापासून ‘शेजारचा देश’ असे शब्द वापरावे लागत होतं.

‘आप की आदालत’ मध्ये आमिर खान म्हणाला, ‘तुम्ही भारतीय चित्रपटांचा इतिहास पाहू शकता. पाकिस्तान नाव सिनेमांमध्ये घेण्याची परवानगी सेन्सॉर बोर्डने दिलेली नव्हती. सिनेमांमध्ये ‘शेजारचा देश’ हा शब्द वापरला जात होता.

 

 

सेन्सॉर बोर्ड नेहमीच आपल्याला शेजारच्या देशाबद्दल बोलण्यास सांगते, आपण त्याचे (पाकिस्तानचे) नाव घेऊ शकत नाही. पूर्वी सिनेमांमध्ये शेजारील देशाने हल्ला केला. शेजारील राष्ट्र विरोधात आहे… असं सिनेमांमध्ये म्हणावं लागायचं. तुम्हाला माहिती आहे, सरफरोश हा माझ्या इतिहासातील पहिला सिनेमा आहे ज्यामध्ये आम्ही उघडपणे पाकिस्तानचं नाव घेतलं. आम्ही उघडपणे आयएसआयचे नाव घेतलं.’

‘दिग्दर्शत जॉन म्हणाले होते की, सेन्सॉर बोर्ड सिनेमाला मान्यता देणार नाही. मी म्हणालो का नाही मान्यता देणार? आपण त्यांना समजावून सांगू की जेव्हा अडवाणीजी संसदेत म्हणू शकतात की पाकिस्तान आपल्याशी गैरवर्तन करत आहे. ते आपल्या देशात दहशतवाद पसरवत आहे. जेव्हा अडवाणीजी आपल्या संसदेत म्हणू शकतात तर आपण का म्हणू शकत नाही?’

‘त्या आधारावर माझ्या सरफरोश सिनेमाला सेन्सॉर बोर्डकडून मान्यता मिळाली. सरफरोश पहिला सिनेमा होता, ज्यामध्ये पाकिस्तान आणि त्याची गुप्तचर संस्था आयएसआय यांचे उघडपणे नाव घेण्यात आलं होतं. अशात जेव्हा लोकं म्हणतात की, मी पाकिस्तान विरोधात का बोलत नाही… तर सर्वात आधी पाकिस्तानचं नाव मी घेतलं होतं…’ असं देखील अभिनेता आमिर खान म्हणाला.