माझ्या मुली आणि बहिणींनी हिंदूंशी…, लव्ह जिहादचे आमिर खानवर आरोप, अभिनेत्याचे लक्षवेधी वक्तव्य
Aamir Khan On Love Jihad: माझ्या मुली आणि बहिणींनी हिंदूंशी..., लव्ह जिहादचं आमिर खान करतो समर्थन? अभिनेत्याचं लक्षवेधी वक्तव्य सध्या तुफान चर्चेत... आमिर खान कायम खासगी आयुष्यामुळे असतो चर्चेत...

Aamir Khan On Love Jihad: अभिनेता आमिर खान याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. आजपर्यंत अनेक हीट सिनेमांमध्ये आमिर खान याने दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. पण आमिर कायम त्याच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिला. आता देखील आमिर खान याने स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल मोठे खुलासे केले आहे. बहिणी आणि मुलीने हिंदू समाजात लग्न केलं याबद्दल देखील आमिर खान याने मौन सोडलं आहे. एवढंच नाही तर लव्ह जिहादवर देखील आमिर खान याने मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आमिर खान याची चर्चा रंगली आहे .
‘आप की अदालत’ या कार्यक्रमात आमिर खान याच्यावर अनेक आरोप करण्यात आले. ज्यावर अभिनेत्याने लक्षवेधी उत्तरं दिली आहे. 10 वर्षींपूर्वी 10 डिसेंबर 2014 मध्ये ‘पीके’ सिनेमा प्रदर्शित झाला होता. सिनेमाची कथा पाकिस्तानी मुलगा आणि भारतीय मुलगी याच्या प्रेमा भोवती फिरताना दिसली. ज्यामुळे अनेक वाद देखील निर्माण झाले. पण आमिर खान सिनेमाच्या कथेचं समर्थन केलं. म्हणून आमिर याच्यावर लव्ह जिहाद सारखे आरोप करण्यात आले. आता अनेक वर्षांनंतर आमिर खान याने आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे आणि प्रेम धर्मापेक्षा वर आहे… हे सिद्ध केलं.
View this post on Instagram
यावेळी आमिर खान याने त्याच्या दोन बहिणी आणि मुलीचं उदाहरण दिले आणि प्रेम करणाऱ्यांचं समर्थन केलं. आमिर खान याला ‘ट्रोलर्स म्हणतात तू लव्ह जिहाद करत आहेस, पीके सिनेमात तू हिंदू मुलीचं पाकिस्तानी मुलासोबत लग्नाला बरोबर म्हणालास?’
यावर आमिर खान म्हणाला, ‘जेव्हा दोन वेगळ्या धर्मातील व्यक्ती एकत्र येतात. त्याचं कारण फक्त आणि फक्त प्रेम असतं. प्रत्येक वेळेस ते लव्ह जिहाद असू शकत नाही. याला माणुसकी म्हणतात. जी धर्माच्या वर आहे. माझी बहीण निखत हिने हिंदू संतोष हेगडे यांच्यासोबत लग्न केलंय. याला तुम्ही लव्ह जिहाद म्हणाल? माझी लहान बहीण फरहत हिने हिंदू राजीव दत्ता याच्यासोबत लग्न केलंय. याला तुम्ही लव्ह जिहाद म्हणाला? माझी मुलगा आयरा हिने हिंदू नुपूर शिखरे याच्यासोबत लग्न केलं. याला तुम्ही लव्ह जिहाद म्हणाला? प्रेम आयुष्यात सर्वात मोठी गोष्ट आहे…’ असं देखील आमिर खान यावेळी म्हणाला.
