
सुपरस्टार अभिनेता आमिर खान त्याच्या चित्रपटासाठी खूपच मेहनत घेत असतो. मोजकेच चित्रपट करीत असतो. त्यामुळे त्याला ‘मिस्टर परफेक्टनिस्ट’ म्हटले जाते. त्याचा नुकताच ‘सितारे जमीन पर’ चित्रपट आला होता. आता २७ वर्षांनंतर अभिनेता आमिर गायनाचा प्रयत्न करीत आहे. त्याने एका कॉमेडी चित्रपटात आमीर आपला गायनाचा छंद जोपसणार आहे. याची माहीती त्याने स्वत:च दिली आहे.
आमिरने अलिकडेच बॉलीवूड हंगामाशी बोलताना सांगितले की तो एका अजून नाव निश्चित न झालेल्या कॉमेडी चित्रपटासाठी अभिनयासह गायनाचा रोल करणार आहे. त्यासाठी त्याने गायनाचा सराव सुरु केला आहे आणि प्रशिक्षणही घेत आहे. आमिर राणी मुखर्जी सोबतच्या गुलाम चित्रपटात आती क्या खंडाला हे गाणे गाऊन धम्माल उडविली होती. आता २७ वर्षांनंतर आमीर पुन्हा आपला गायकीचा वापर स्वत:साठी वापर करणार आहे.आमिर म्हणाला की गुलाम साठी मी आती क्या खंडाला हे गीत सहज मजा म्हणून गायले होते.नशीबाने ते हिट झाले. आता गेल्याकाही वर्षांपासून एक प्रोफेशन सिंगर बनण्यासाठी मी ट्रेनिंग घेत आहे. हा चित्रपट बासु चटर्जी आणि ऋषिकेश मुखर्जी यांच्यापासून प्रेरणा घेतला चित्रपट आहे. असे हलके फुलके चित्रपट आजकल बनवणे आपण विसरत चाललो आहोत. या चित्रपटात कोणीही व्हिलन नसतो. किंवा त्यात कोणी मरत नाही. हा चित्रपट तुम्हाला चांगली फिलींग देईल असेही आमीर याने सांगितले.
या कॉमेडी चित्रपटात माझी भूमिका लहान असणार आहे. परंतू या चित्रपटातील दोन गाणी मी गाणार आहे. त्याची ट्रेनिंग एक प्रसिद्ध लोकगायिका सुचेता भट्टाचार्य यांच्याकडून घेत असल्याचे आमीर याने सांगितले. जेव्हापासून मी आती क्या खंडाला गायले आहे. तेव्हापासून मी गायनाचे प्रशिक्षण घेत आहे. आणि माझ्या गुरु सुचेता भट्टाचार्य आहेत असेही तो म्हणाला.
‘सितारे जमीन पर’ नंतर आमिर खानकडे अनेक प्रोजेक्ट्स आहेत. आता तो रजनीकांतच्या ‘कुली’ चित्रपटातही दिसणार आहे, ज्यामध्ये देखील तो एक छोटी भूमिका साकारणार आहे. त्यानंतर आमिर राजकुमार हिरानी यांच्यासोबत दादासाहेब फाळके यांच्या बायोपिकमध्येही काम करणार आहे. साऊथचे दिग्दर्शक लोकेश कनागराज यांच्यासोबतही त्याच्या प्रोजेक्ट सुरु असून हा एक सुपरहिरो टाईपचा चित्रपट असेल.