AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाप्पाला अक्षरश: हवेत लटकवून ठेवणं..; गणेशमूर्तींच्या बदलत्या ट्रेंडवर आरती सोलंकी संतापली

Aarti Solanki: 'फू बाई फू' फेम अभिनेत्री आरती सोलंकीने गणपतीच्या मूर्तींचं बदलतं स्वरूप आणि वाढत्या प्रदर्शनाबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. तिची ही पोस्ट नेटकऱ्यांमध्ये चांगलीच चर्चेत आली आहे.

बाप्पाला अक्षरश: हवेत लटकवून ठेवणं..; गणेशमूर्तींच्या बदलत्या ट्रेंडवर आरती सोलंकी संतापली
गणपतींच्या मूर्त्यांबाबत आरती सोलंकीची पोस्टImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 01, 2026 | 7:52 AM
Share

गणेशोत्सव म्हटलं की भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाने वातावरण भारून जातं. गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झाली की घरगुती गणपतीपासून सार्वजनिक मंडळांपर्यंत विविध प्रकारच्या मूर्ती पाहायला मिळतात. मात्र, बदलत्या काळानुसार गणपतीच्या मूर्तींमध्येही अनेक प्रयोग केले जात आहेत. याच मुद्द्यावर अभिनेत्री आरती सोलंकी हिने नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने गणपती बाप्पाच्या मूर्तींना वेगवेगळ्या पद्धतीने सजवण्याच्या ट्रेंडवर सवाल उपस्थित केला. ‘फू बाई फू’सारख्या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली आणि प्रेक्षकांना पोट धरून हसवणारी लोकप्रिय अभिनेत्री आरतीने या पोस्टमध्ये मंडळांमध्ये वाढलेल्या स्पर्धेचाही उल्लेख केला आहे.

‘अरे हे काय चालवलंय? गणपती बाप्पाचं रुप मुळातच सुरेख, देखणं, गोड असताना बाप्पाला वेगळं रुपात घडवण्याची गरजच काय? मंडपात देखावा हवा तो करा. खरंतर त्याचीही गरज नाही, पण मंडळाच्या स्पर्धेत वाढ झाली काय करणार? सगळ्यात वाईट गोष्ट बॅलेन्सिंगच्या नावावर अक्षरश: बाप्पाला हवेत लटकवून ठेवणं हे योग्य आहे का? वाईट वाटतं बाप्पासाठी. सण आणि बाप्पा हा पारंपरिक हवा. स्वत:च्या मुलांना फॅन्सी ड्रेस स्पर्धेत तयार करतात तसं बिचाऱ्या बाप्पाला सजवतायत. माफ करा बाप्पा.. तुम्ही बुद्धीचे देवता आहात. आता याल तर सगळ्यांना चांगली बुद्धी द्या’, अशी पोस्ट तिने लिहिली आहे.

आरतीची पोस्ट-

मंडपात बाप्पा वेगळा आणि हटके दिसावा, ही इच्छा समजू शकते. मात्र, त्यासाठी बाप्पाच्या मूर्तीमध्ये अवास्तव प्रयोग करण्याची गरज नाही. विशेषतः ‘बॅलन्सिंग’च्या नावाखाली बाप्पाला अक्षरशः हवेत लटकवून ठेवणं योग्य आहे का? असा प्रश्न आरतीने उपस्थित केला.

आरतीने या ट्रेंडला केवळ मूर्तीच्या सौंदर्याचा विषय न मानता त्यामागील भावनांशी जोडलं आहे. तिच्या मते, गणपती बाप्पा हा आपल्यासाठी केवळ सजावटीचा भाग नाही, तर श्रद्धेचं आणि भक्तीचं प्रतीक आहे. त्यामुळे बाप्पाच्या मूर्तीला वेगवेगळ्या प्रकारे सजवताना किंवा स्पर्धेसाठी हटके रूप देताना भक्तीची भावना आणि परंपरेचाही विचार व्हायला हवा.

आरती सोलंकीच्या या पोस्टमुळे गणपतीच्या मूर्तींचं बदलतं स्वरूप, वाढतं प्रदर्शन आणि पारंपरिक श्रद्धा विरुद्ध आधुनिक सजावट हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. तिच्या मताशी अनेक भक्त सहमत होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार