AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Roy: घटस्फोटानंतर पूर्व पत्नीला दिली मोठी संपत्ती; ‘आशिकी’ फेम राहुल रॉयने स्वतः झेलली आर्थिक तंगी

Rahul Roy: 'आशिकी' फेम अभिनेता राहुल रॉय लग्नाच्या 14 वर्षांनंतर पत्नी राजलक्ष्मीपासून विभक्त झाला. घटस्फोटानंतर त्याने पत्नीच्या नावावर स्वेच्छेने काही मालमत्ता केली होती. सध्या तो आर्थिक संकटांचा सामना करत आहे.

Rahul Roy: घटस्फोटानंतर पूर्व पत्नीला दिली मोठी संपत्ती; 'आशिकी' फेम राहुल रॉयने स्वतः झेलली आर्थिक तंगी
अभिनेता राहुल रॉय आणि त्याची पूर्व पत्नी राजलक्ष्मी खानविलकरImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 09, 2026 | 11:45 AM
Share

Rahul Roy: ‘आशिकी’ या चित्रपटातून रातोरात स्टार झालेला अभिनेता राहुल रॉय सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. आर्थिक अडचणी, आरोग्याच्या समस्या आणि कायदेशीर प्रकरणांबाबत राहुलने अलीकडेच भाष्य केलं. त्याचवेळी त्याची पूर्व पत्नी राजलक्ष्मी खानविलकरसोबतच्या नात्याची आणि घटस्फोटानंतर घेतलेल्या एका मोठ्या निर्णयाचीही चर्चा होत आहे. राहुल रॉय आणि राजलक्ष्मी खानविलकर यांची भेट 1998 मध्ये एका पार्टीदरम्यान झाली होती. राजलक्ष्मी त्या काळातील प्रसिद्ध मॉडेल होती. दोघांमध्ये मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि जवळपास दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी 2000 मध्ये लग्न केलं.

लग्नानंतर काही काळ दोघांचं वैवाहिक आयुष्य सुखाचं होतं. मात्र, पुढे राजलक्ष्मीने तिच्या बिझनेससाठी ऑस्ट्रेलियात जाण्याचा निर्णय घेतला. राहुलही काही काळ तिच्यासोबत ऑस्ट्रेलियात राहिला. मात्र तिथे त्याला अपेक्षित व्यावसायिक संधी मिळू शकल्या नाहीत. त्यानंतर तो भारतात परतला आणि आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करू लागला. अखेरीस दोघांमध्ये अंतर वाढत गेलं. लाँग डिस्टन्स रिलेशनशिप टिकवणं कठीण झाल्याने त्यांनी परस्पर संमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. 2014 मध्ये त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाली. दोघांना मुलं नसल्यामुळे विभक्त होण्याचा निर्णय तुलनेनं शांततेत घेता आल्याचं राहुलने सांगितलं आहे.

घटस्फोटानंतर पूर्व पत्नीच्या नावावर संपत्ती

राहुलने त्याच्या काही महत्त्वाच्या मालमत्ता स्वेच्छेने राजलक्ष्मीच्या नावावर केल्याचं समोर आलं आहे. या निर्णयाचा परिणाम त्याच्या आर्थिक परिस्थितीवरही झाला. मात्र, या सगळ्यानंतरही राजलक्ष्मीबद्दल आपल्या मनात कोणताही राग नसल्याचं राहुलने स्पष्ट केलं आहे. तिचं कुटुंब आजही आपल्यासाठी कुटुंबासारखंच असल्याचं त्याने म्हटलं आहे.

आरोग्याच्या समस्यांमुळे करिअरला मोठा ब्रेक

राहुलच्या आयुष्यातील आणखी एक मोठा टप्पा म्हणजे 2020 मध्ये आलेला ब्रेन स्ट्रोक. कारगिलमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याला स्ट्रोक आला होता. त्यानंतर त्याच्या चालण्यावर आणि बोलण्यावर परिणाम झाला आणि बराच काळ त्याला रिकव्हरीसाठी द्यावा लागला. आता 60 वर्षांच्या राहुलला पुन्हा आपल्या करिअरला सुरुवात करायची आहे. आर्थिक अडचणी असूनही तो काम मिळवून पुन्हा स्वतःचं आयुष्य उभं करण्याचा प्रयत्न करत आहे. कार्यक्रमांना उपस्थित राहून आणि मिळेल ते काम स्वीकारून तो कमाई करत असल्याचंही त्याने सांगितलं आहे.

Follow Us
सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
Sushma Andhare : सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा....
Bhaskar Jadhav : 32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा, पुढे म्हणाले....
जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
Shrikant Shinde On Jarange Patil : जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया आली समोर, पुढे म्हणाले...
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया....
Shirkant Shinde On Audio Clip : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; जरांगेंनी सांगितली मराठा..
Manoj Jarange On Maratha : आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; मनोज जरांगेंनी सांगितली मराठा आरक्षण आंदोलनाची रणनीती
या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
Prasad Lad On Viral Audio Clip : या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं...
Aditya Thackeray : ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; जरांगेंचा दावा
Manoj Jarange Patil : मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; मनोज जरांगेंचा मोठा दावा, पुढे म्हणाले...
एकनाथ शिंदेंच्या मुलांना पैसे दिले, हे रामदास कदमांनीच सांगितलं....
Manoj Jarange On Viral Clip : एकनाथ शिंदेंच्या मुलांना पैसे दिले, हे रामदास कदमांनीच सांगितलं; जरांगेंचा दावा, महायुतीत पुन्हा खळबळ
हाथी चले बाजार, कुत्ते भोंके हजार! प्रसाद लाड यांचा संजय राऊतांना टोला
Prasad Lad On Sanjay Raut : हाथी चले बाजार, कुत्ते भोंके हजार! प्रसाद लाड यांचा संजय राऊतांना टोला; ऑडिओ क्लिपवरून राजकीय घमासान