बॉबी देओलला आलेला अटॅक, म्हणाला, ‘प्रचंड घाबरलेलो…’, गंभीर आजाराचा सामना करतोय अभिनेता

Bobby Deol on Vertigo Attack: 'आश्रम' फेम अभिनेता करतोय गंभीर आजाराचा सामना, डोळ्यासमोर अचानक अंधार येता त्यानंतर..., अटॅक आल्यानंतर म्हणाला, 'प्रचंड घाबरलेलो कारण... ', अभिनेता सध्या 'आश्रम' सीरिजमुळे आहे चर्चेत

बॉबी देओलला आलेला अटॅक, म्हणाला, प्रचंड घाबरलेलो..., गंभीर आजाराचा सामना करतोय अभिनेता
| Updated on: Mar 06, 2025 | 10:02 AM

Bobby Deol on Vertigo Attack: अभिनेता बॉबी देओल स्टारर ‘आश्रम’ सीरिजचा सीझन 3 पार्ट 2 प्रदर्शित झाला आहे. सीझन चाहत्यांच्या देखील पसंतीस उतरत आहे. सीरिजमध्ये बॉबी देओल याने साकारलेल्या बाबा निराला या भूमिकेचं देखील सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. सर्व ‘आश्रम’ सीरिजची चर्चा रंगलेली असताना बॉबीने स्वतःबद्दल मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्या त्याला असलेल्या गंभीर आजाराबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. त्याने सांगितलं, प्रमोशन दरम्यान त्याला एक अनुभव आला ज्यामुळे तो खूप अस्वस्थ झाला होता. यामुळे अभिनेत्याला घाम फुटला आणि तो खूप घाबरला. त्याला भीती वाटल्याचेही अभिनेत्याने सांगितले.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत बॉबी देओल याने मोठा खुलासा केला आहे. पहिल्यांदा ‘आश्रम’ सीरिजचं प्रमोशन करत असताना अभिनेताला चक्कर आली. अभिनेत्याने व्हर्टिगो अटॅकबद्दल मोठा खुलासा केला आहे. अभिनेता म्हणाला, ‘पहिल्यांदा खलनायकाची भूमिका बजावत असल्यामुळे माझ्या मनात भीती होती. मला आठवत आहे की, सिनेमाचा प्रचार करत असताना, मला व्हर्टिगो अटॅक आला. कारण मला व्हर्टिगोचा त्रास आहे. अशी भूमिका बजावल्यानंतर लोकांची काय प्रतिक्रिया असेल. याची मला भीती वाटत होती. मझ्या मनात भीती होती आणि आणि मी घाबरलो होतो… माझ्या डोळ्यांसमोर पूर्ण अंधार आला होता…’

पुढे अभिनेता म्हणाला, ‘अभिनेता कधी दुसऱ्यावर इतका प्रभावित की, ज्यामुळे त्याला स्वतःच्या क्षमतांचा विसर पडतो. अभिनेत्याबद्दल सर्वात वाईट गोष्ट म्हणजे सतत विचार करत असताना, जे आपण मिळवू शकतो, त्यावर देखील त्यांचा विश्वास बसत नाही. आपल्याला काय हवं आहे, ते मिळवण्यासाठी नंतर सोप्या मार्गाची निवड केली जाते..’

त्यानंतर अभिनेता म्हणाला, बाबा निराला ही भूमिका साकारणं त्याच्यासाठी सोपी निवड नव्हती कारण तो त्याच्या कारकिर्दीला पुन्हा सुरुवात करत आहे आणि त्याने अशी भूमिका निवडली आहे ज्यामध्ये तो यापूर्वी कधीही दिसला नव्हता. पण चाहत्यांना अभिनेत्याची भूमिका आवडली.

या सिनेमांतून येणार चाहत्यांच्या भेटीस

सध्या खलनायकाच्या भूमिकेत बॉबी देओल दमदार काम करत आहे.’ॲनिमल’ सिनेमातील बॉबी देओलच्या भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं आहे. लवकरच अभिनेता, देओल ‘हाउसफुल 5’, ‘वेलकम टू द जंगल’ आणि ‘हरी हरा मल्लू’ सिनेमांच्या माध्यमातून अभिनेता चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.