AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिग बॉस फेम अब्दू रोजिक याच्या साखरपुड्याचे फोटो समोर, ‘लडकी अच्छी ढूंढ निकाली ब्रदर’

Abdu Rozik Engagement | बिग बॉस फेम अब्दू रोजिक याच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात, छोट्या भाईजानने उरकला साखरपुडा, होणाऱ्या पत्नीसोबत फोटो पोस्ट करत अब्दू म्हणाला..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अब्दू याच्या साखरपुड्याची चर्चा...

बिग बॉस फेम अब्दू रोजिक याच्या साखरपुड्याचे फोटो समोर, 'लडकी अच्छी ढूंढ निकाली ब्रदर'
| Updated on: May 11, 2024 | 1:35 PM
Share

‘बिग बॉस 16’ मध्ये दिसल्यापासून गायक अब्दू रोजिक याच्या चाहत्यांच्या संख्येत फार मोठी वाढ झाली आहे. अब्दू रोजिक आता त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अब्दू याचा साखरपुडा झाला आहे. गुरुवारी एका व्हिडीओ पोस्ट करत अब्दू याने चाहत्यांसोबत आनंद शेअर केला होता. अब्दू याने साखरपुड्याचे काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अब्दू याच्या साखरपुड्याची चर्चा रंगली आहे. अब्दूने सोशल मीडियावर त्याच्या साखरपुड्याचे काही फोटो शेअर केले आहेत ज्यात त्याची होणारी पत्नी पांढऱ्या बुरख्यात आहे आणि अब्दू तिला अंगठी घालताना दिसत आहे.

अब्दू याने साखरपुड्याने फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये, ‘अल्हम्दुलिल्लाह…’ असं लिहिलं आहे. शिवाय अब्दू याने फोटो पोस्ट करत अनेक हॅशटॅग देखील वापरले आहेत. जिनमें #forever #love #life #engagement #nikkah #bride #wedding #marriage #abdurozik #dubai #sharjah असे हॅशटॅग अब्दू याने पोस्ट केले आहे. अब्दू याच्या पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

कोण आहे अब्दू याची होणारी पत्नी?

शारजाह एमिरेटमधील अमीरासोबत लग्न करण्यासाठी अब्दू आनंदी आणि उत्साही आहे. अब्दू म्हणाला, मी माझ्या आयुष्यातील नवीन प्रवास सुरू करण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही…’, दोघांच्या पहिल्या भेटीबद्दल सांगायचं झालं तर, फेब्रुवारीमध्ये दुबई मॉलमधील सिप्रियानी डोल्सी येथे दोघांनी भेट झाली आहे.

अब्दू याने होणाऱ्या पत्नीसाठी व्यक्त केलेल्या भावना

व्हिडीओ शेअर करत अब्दू रोजिक याने कॅप्शनमध्ये स्वतःच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘मी एवढा भाग्यशाली असेल… याचा मी आयुष्यात कधीच विचार केला नव्हता. मला खास व्यक्तीकडून प्रेम मिळेल, जी माझा सन्मान करते. माझ्या आयुष्यातील अडचणींना त्रास समजत नाही. 7 जुलै सेव्ह द डेट.. मी शब्दात नाही सांगू शकत की मी किती आनंदी आहे…’ असं अब्दू रोजिक म्हणाला. 7 जुलै रोजी अब्दू याचं लग्न होणार आहे.

20 वर्षीय अब्दू रोजिक 19 वर्षीय तरूणीसोबत लग्न करणार आहे. चाहते देखील अब्दू याच्या लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत. अब्दू याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अब्दू कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतो. ‘बिग बॉस’मुळे अब्दू याच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत मोठी वाढ झाली.

सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?.