‘आदर्श म्हणून माझ्याकडे पाहा, मी सेलिब्रिटी…’, अभिजीत बिचुकले याचा तरुणांना सल्ला
Abhijit Bichukale : व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने अभिजीत बिचुकले कडून तरुणांसाठी मोठी भेट, म्हणाला, 'आदर्श म्हणून माझ्याकडे पाहा, कारण...' सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिजीत बिचुकले याची चर्चा...

मुंबई | 13 फेब्रुवारी 2024 : बिगबॉस फेम अभिजीत बिचुकले कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता अभिजीत बिचुकले एका म्यूझिक अल्बममुळे चर्तेत आहे. अभिजीत बिचुकले याचा व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने प्रेमाची कविता असलेला व्हिडिओ अल्बम 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता प्रसिद्ध होणार आहे. अल्बममध्ये अभिजीत बिचुकले लव्हर बॉयच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. सोशल मीडियावर अल्बमचा टीझर तुफान व्हायरल होत आहे. यानिमित्ताने अभिजीत बिचुकले याने तरुणांना सल्ला देखील दिला आहे, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिजीत बिचुकले याची चर्चा रंगली आहे.
अभिजीत बिचुकले म्हणाला, ‘लोकांना आता मुंबई अभिजीत बिचुकले कवी मनाचे नेते, गीतकार, संगीतकार, अभिनेता म्हणून दिसणार आहे.’ असं म्हणत अभिजीत बिचुकले याने व्हिडीओ तयार करण्यासाठी मित्रपरिवाराने घेतलेल्या मेहनतीसाठी देखील अभिजीत बिचुकले याने आभार मानले. पुढे व्हिडीओ म्यूझिक बद्दल अभिजीत म्हणाला, ‘व्हॅलेंटाईन डे असल्यामुळे कॉलेजच्या दिवसांमध्ये जे काही करत होतो आणि कलाकार म्हणून ज्या गोष्टी करायच्या राहून गेल्या त्या व्हिडीओ अल्बमच्या माध्यमातून चाहत्यांच्या समोर येणार आहेत.’
‘तुमचं आयुष्य जगत असताना स्वतःचे ध्येय आणि धोरणं ठरवा. व्यसनाच्या पाठी लागू नका आणि तुम्हाला जर काही करायचं असेल तर, आदर्शवत म्हणून अभिजीत बिचुकले म्हणजे माझ्याकडे पाहा. मी गीतकार आहे, संगीतकार आहे, गायक आहे. अभिनेता आहे. मी सेलिब्रिटी आहे आणि मी राजकीय नेता देखील आहे. माझी मतं मी ठामपणे मांडतो. माझ्यातला एक गुण जरी तुम्ही घेतला. तरी तुम्ही मोठं होऊ शकता. पण शेवटी तुमचं नशीब तुमच्या बरोबर…’ असं देखील अभिजीत बिचुकले म्हणाला.
अभिजीत बिचुकले कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता सध्या अभिजीत बिचुकले नव्या गाण्यामुळे चर्चेत आला आहे. अभिजीत बिचुकले कायम सामाजिक आणि राजकीय विषयांवर बोलताना दिसतो. एवढंच नाही तर, राजकारणी व्यक्तींनी अभिजीत बिचुकले विरोध देखील करतो. ज्यामुळे त्याला ट्रोलिंगचा देखील समाना करावा लागतो.
