
Abhishek Bachchan and Aishwarya Rai Wedding : अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या लग्नाला अनेक वर्ष झाली आहे. 2007 मध्ये अत्यंत खासगी पद्धतीत दोघांचं लग्न झालं. पण आजही दोघांच्या लग्नाची चर्चा सुरु असते. एक काळ असा देखील होता जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त दोघांच्या लग्नाची चर्चा सुरु होती. तेव्हा दोघांचा एक फोटो समोर आलेला, जो एका पापाराझीने क्लिक केला होता. पण ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या लग्नात असं काही झालं होतं. ज्यामुळे पापाराझींनी संपूर्ण बच्चन कुटुंबाला बॅन केलं होतं… याबद्दल फार कोणाला माहिती नाही. पण नुकताच झालेल्या एका मुलाखतीत एका पत्रकार महिलेने मोठा खुलासा केला आहे.
ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या लग्नात पापाराझींना मारहाण देखील करण्यात आली होती. याच कारणामुळे संपूर्ण बच्चन कुटुंबियांना बॅन करण्यात आलं होतं. याबद्दल फार कोणाला माहिती नाही. पण नुकताच झालेल्या एका मुलाखतीत वरिष्ठ पत्रकार हिना कुमावती यांनी मोठा खुलासा केला. ऐश्वर्या – अभिषेक यांच्या लग्नात काय झालं होतं… याबद्दल त्यांनी सांगितलं आहे.
मुलाखतीत हिना कुमावती म्हणाल्या, ‘आम्ही ऐश्वर्या आणि अभिषेक यांचं लग्न शूट करण्यासाठी गेलेलो… तीन दिवस आम्ही बच्चन कुटुंबियांच्या घरी गेलेलो… पण आम्हाला सेरिमनीची एकही झलक पाहता आली नाही… पण वरिंदर (पपाराजी वरिंदर चावला) यांनी नव वधू – वराच्या रुपात ऐश्वर्या आणि अभिषेक यांचा एक फोटो घेतला होता..’
‘त्या क्षणानंतर आणि त्या फोटोने सर्वकाही बदललं… विशेषतः ब्रॉडकास्ट मीडियासाठी. तेव्हा आम्हाला कळकं की मोठ – मोठे कॅमेरे घेवून पळण्यात… फोटो कढण्यात काही अर्थ नाही. आता सर्वकाही प्रॅक्टिकल झालं आहे. वरिंदक यांनी त्यांच्या फोनने फोटो काढला होते आणि तेच फोटो व्हायरल देखील झाले. तो फोटो प्रत्येक न्यूज पेपर आणि प्रकाशनात प्रकाशित झाला होता. एक गोष्ट याठिकाणी मला सांगायची आहे आणि ती म्हणजे तेव्हापासूनच पापाराझी कल्चर उदयास आला…
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्याचा तो फोटो काढणाऱ्या फोटग्राफ वरिंदर चावलासाठी हा क्षण खूप महागात पडला. कुमावती म्हणाल्या, ‘तिथे तैनात असलेल्या सिक्योरिटीने आमच्यासोबत वाईट वर्तन केलं… आम्हाला मारहाण करण्यात आली. अमर सिंह याची सिक्योरिटी होती. त्यांनी आम्हाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली… बंदुकीने देखील मारलं… त्या घटनेनंतर सर्व फोटोग्राफरने बच्चन कुटुंबियांना बॅन केलं होतं…’
पुढे कुमावती म्हणाल्या, ‘त्यानंतर जेव्हा बच्चन कुटुंब कोणत्या कार्यक्रमासाठी फोटोसाठी उभे राहायचे तेव्हा कोणताच फोटोग्राफर त्यांच्या कुटुंबाचे फोटो क्लिक नाही करायचे… काहीतरी बिनसलं आहे असं बच्चन कुटुंबाला कळालं… अखेर मॅरियट हॉटेलमध्ये सर्वांना बोलवण्यात आलं आणि पत्रकारांसोबत संवाद साधण्यात आला आणि माफी मागितली…. त्यानंतर बच्चन कुटुंबावरील बॅन हटवण्यात आला.’ असं देखील कुमावती म्हणाल्या.