Abhishek Bachchan- Aishwarya Rai : मुंबई, लंडन नव्हे, या शहरात सुरू झाली ऐश्वर्या-अभिषेकची लव्हस्टोरी, मुलीचंही खास कनेक्शन; इतक्या वर्षानंतर…
अभिषेक बच्चनने जयपूर पिंक पँथर्स कबड्डी संघाची मालकी घेण्यामागचे खास कारण उघड केले. त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडीत एक किस्साही त्याने यावेळी सांगितला.

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) हा फक्त हिंदी चित्रपटांशीच निगडीत नाही, तर त्यासोबतच तो एका कबड्डी टीमचाही मालक आहे. 2014 साली अभिषेकने अशा एका गेममध्ये गुंतवणूक केली , जो गेम त्याच्यासाठछी खूपच खास आहे. जयपूर पिंक पँथरची निवड का केली, हे अभिषेकने नुकतंच जाहीर केलं. त्यामागे खास कारण आहे आणि ते त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी देखील निगडीत आहे. खरंतर हे तेच शहर आहे, जिथून अभिषेक आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांची लव्हस्टोरी सुरू झाली. पिंक आणि पँथरशीही त्याचं खास कनेक्शन आहे.
जयपूरमधून सुरू झालं डेटिंग
अभिषेकने अलीकडेच PWC इंडियाचे चेअरपर्सन संजीव कृष्णन यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी जयपूर शहराशी असलेल्या आपल्या जिव्हाळ्याबद्दल तो भरभरून बोलला. एवढंच नव्हे तर त्याचे वडील, अर्थात दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांना खेळ किती आवडतो हेही त्याने आवर्जून सांगितलं. जयपूर हे शहर माझ्यासाठी भावनिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे आहे, असं अभिषेक म्हणाला. कारण याच ठिकाणी माझ्या पहिल्या चित्रपटाचं थोडं शूटिंग झालं होतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे, याच शहरात मी आणि ऐश्वर्याने एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती, असं अभिषेकने नमूद केलं. त्यामुळे या शहराशी माझा एक भावनिक संबंध आहे. गुलाबी रंगही माझ्यासाठी खास आहे, कारण त्या काळात तो माझ्या मुलीचा आवडता रंग होता, असंही अभिषकेने यावेळी बोलताना सांगितलं.
लहानपणी मला माझे बाबा ‘पँथर’ या नावाने हाक मारायचे. हा आमच्यातला एक मजेशीर संवादाचा भाग होता. आता त्याच ‘पिंक पँथर’ नावाची कबड्डी टीम माझ्याकडे आहे, असा खास किस्साही अभिषेकने यावेळी आवर्जून सांगितला.
इतक्या कलाकारांना समोर पाहून टीमवर आला दबाव …
यावेळी अभिषेकने सांगितलं की तो आपल्या टीमसोबत फक्त मालक म्हणून नव्हे, तर खेळाडूंच्या अगदी जवळ राहून सहभागी व्हायचा. सामन्याच्या काही आठवडे आधी तो खेळाडूंसोबत ट्रेनिंग करायचा, त्यांच्यासोबत जेवायचा आणि त्यांच्या डाएटवरही लक्ष ठेवायचा. एवढंच नाही, तर खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या आलू पराठ्यांवरही त्याने प्रश्न उपस्थित केला होता! पण टीमच्या पहिल्या सामन्यात एक वेगळीच ‘स्टार पॉवर’ पाहायला मिळाली. खेळाडू मैदानात उतरले आणि समोर अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, शाहरुख खान असे अनेक दिग्गज बसले होते, मागे ऐश्वर्या रायही होती. . एवढ्या मोठ्या कलाकारांना आणि दिग्गजांना समोर पाहून टीममधील खेळाडूंचे लक्ष खेळावर केंद्रित करता येत नव्हतं. त्यांचा फोकसच उडाला होता, असा मजेशीर किस्सा त्याने सांगितला. अभिषेकच फक्त कबड्डी टीमचा नव्हे तर फूटबॉल टीमचाही मालक आहे.