अभिषेक बच्चनच्या नवीन रिलीज चित्रपटाची वाईट अवस्था; 2 आठवड्यातच गाशा गुंडाळला, चित्रपटाचे कलेक्शनही अत्यंत कमी

अभिषेक बच्चनचा नवीन चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला. पहिल्याच आठवड्यात अत्यंत कमी कलेक्शम झालेला हा पहिलाच चित्रपट असेल. तसेच अभिषेकच्या आतापर्यंतच्या करिअरमधील सर्वात कमी कमाई करणारा चित्रपट ठरू शकतो. प्रेक्षकांनी नेमका कोणता बदला घेतला? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अभिषेक बच्चनच्या नवीन रिलीज चित्रपटाची वाईट अवस्था; 2 आठवड्यातच गाशा गुंडाळला, चित्रपटाचे कलेक्शनही अत्यंत कमी
Follow us
| Updated on: Nov 29, 2024 | 12:49 PM

बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन सध्या चर्चेत आहे अर्थातच त्याच्या घटस्फोटाच्या चर्चांमुळे. पण सध्या अभिषेक अजून एका गोष्टीमुळे चर्चेत आहे आणि ते म्हणजे त्याच्या फ्लॉप चित्रपटामुळे. कारण अभिषेकचा नवीन रिलीज चित्रपट हा बॉक्स ऑफिसवर अत्यंत जोरदार आपटला आहे.

अभिषेकचा ‘आय वॉन्ट टू टॉक’हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. शूजित सरकार दिग्दर्शित ‘आय वॉन्ट टू टॉक’ चित्रपट 22 नोव्हेंबर 2024 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाकडून अभिषेकला बऱ्याच अपेक्षा होत्या.मात्र सुरुवातीलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर निराशाजनक सुरुवात केली. अशात नुकत्याच आलेल्या आकडेवारीनुसार, अभिषेक बच्चनच्या आतापर्यंतच्या करिअरमधील सर्वांत कमी कमाई या चित्रपटाने केली असेल.

पहिल्याच आठवड्यात चित्रपट आपटला 

चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात अतिशय कमी कलेक्शन केलं. रिपोर्टनुसार‘आय वॉन्ट टू टॉक’ चित्रपट प्रदर्शित झाल्यावर पहिल्याच दिवशी फक्त 25 लाख रुपयांची कमाई झाली. त्यानंतर वीकेंडला शनिवारी आणि रविवारी देखील कमाईत फार काही वाढ झालेली दिसली नाही. चित्रपटाने शनिवारी 55 लाखांची आणि रविवारी 50 लाखांची कमाई केली. त्यानुसार रविवारपर्यंत चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 1.30 कोटींचा गल्ला जमवला होता.

दुसऱ्या आठवड्यात तरी चित्रपट कमाई करेल अशी आशा होती मात्र दुसऱ्या आठवड्यातही फारसे काही कलेक्शन झालेले दिसले नाही. दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटाचं फार निराशाजनक कलेक्शन झालं. तसेच बाकीच्या दिवसांतही फार कमी कमाई झाली. त्यामुळे दुसऱ्या आठवड्यात चित्रपट1.94 कोटींपर्यंतच पोहोचू शकला आहे.

अत्यंत कमी कलेक्शन 

हा चित्रपट किमान दोन कोटींचे कलेक्शन करेल अशी आशा होती. मात्र तसे चित्र पाहायला मिळाले नाही. रिपोर्टनुसार, अभिषेक बच्चनच्या 20 वर्षांहून अधिकच्या कारकिर्दीतील त्याने अभिनय केलेल्या चित्रपटांपैकी हा एक चित्रपट असेल ज्याची एवढं कमी कलेक्शन झालं असेल.

कोणताही चित्रपट हा 3 ते 4 आठवडे तरी चालतो आणि भरभरून कलेक्शन पदरात पाडून घेतो. पण अभिषेकच्या या चित्रपटाने दोन आठवड्यांमध्येच गाशा गुंडाळला असं दिसून येत आहे. अद्याप या चित्रपटाच्या टीमने किंवा अभिषेकने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे चित्रपट न चालण्याची नेमकी कारणं काय आहेत, कुठे नेमकं चुकलं आहे याबाबत चित्रपटाची टीम नक्कीच विचार करेल असं दिसतंय.

शिंदेंच्या आमदारानं घेतली शपथ पण एकही शब्द वाचता आला नाही?
शिंदेंच्या आमदारानं घेतली शपथ पण एकही शब्द वाचता आला नाही?.
'रवी राणाही आमदारकीचा राजीमाना देतील', नवनीत राणांचं विरोधकांना आव्हान
'रवी राणाही आमदारकीचा राजीमाना देतील', नवनीत राणांचं विरोधकांना आव्हान.
'...हा म्हणजे संविधानाचा अवमान', चंद्रशेखर बावनकुळेंचा 'मविआ'वर घणाघात
'...हा म्हणजे संविधानाचा अवमान', चंद्रशेखर बावनकुळेंचा 'मविआ'वर घणाघात.
निकालानंतर खासगी संस्थेकडून सर्व्हेक्षण, 'सामना'तून थेट आकडेच प्रसिद्ध
निकालानंतर खासगी संस्थेकडून सर्व्हेक्षण, 'सामना'तून थेट आकडेच प्रसिद्ध.
'मी असताना राज ठाकरेंची गरज काय? त्यांना महायुतीत घेतल्यानं नुकसानच..'
'मी असताना राज ठाकरेंची गरज काय? त्यांना महायुतीत घेतल्यानं नुकसानच..'.
'मारकडवाडीचा खरा मास्टर माईंड तर...', राम सातपुतेंनी थेट घेतलं नाव
'मारकडवाडीचा खरा मास्टर माईंड तर...', राम सातपुतेंनी थेट घेतलं नाव.
मनसे कार्यकर्ते ठाकरेंकडे येताच उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोमणा
मनसे कार्यकर्ते ठाकरेंकडे येताच उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोमणा.
राहुल नार्वेकर हेच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष, बिनविरोध होणार निवड
राहुल नार्वेकर हेच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष, बिनविरोध होणार निवड.
EVMवर निवडून आलेल्या मविआच्या सर्वांनी राजीनामा द्या, कोणाचं वक्तव्य?
EVMवर निवडून आलेल्या मविआच्या सर्वांनी राजीनामा द्या, कोणाचं वक्तव्य?.
'सांगा काय चुकल?,' फडणवीसांच्या 'त्या' सल्ल्यावर शरद पवारांचा थेट सवाल
'सांगा काय चुकल?,' फडणवीसांच्या 'त्या' सल्ल्यावर शरद पवारांचा थेट सवाल.