Aamir Khan | ओ तेरी! आमीर खानचा सोशल मीडियाला टाटा बाय बाय!

आमीरने आपल्या या ‘गुडबाय’ पोस्टमध्ये लिहिले आहे की, माझे हृदय तुमच्या प्रेमाने भरले आहे आणि ही माझी शेवटची पोस्ट आहे. आमीर सध्या त्याच्या आगामी 'लालसिंग चड्ढा' चित्रपटाच्या चित्रीकरणात आहे.

Aamir Khan | ओ तेरी! आमीर खानचा सोशल मीडियाला टाटा बाय बाय!
आमीर खान

मुंबई : बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अभिनेता आमीर खानने (Amir Khan) अचानक सोशल मीडिया सोडण्याची घोषणा केली आहे. सुपरस्टारने आपल्या शेवटच्या इंस्टा पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल आभारी आहे. माझे मन तुमच्या प्रेमाने भरले आहे.’ त्याने या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे अभिनेत्याचे चाहते देखील आश्चर्यचकित झाले आहेत. ते सतत सोशल मीडियावरील त्याच्या या पोस्टवर कमेंट करत आहे, इतकेच नाही तर त्यांनी असा अचानक हा निर्णय का घेतला?, हा प्रश्न देखील विचारत आहेत (Actor Amir Khan Quits Social Media).

आमीरने आपल्या या ‘गुडबाय’ पोस्टमध्ये लिहिले आहे की, माझे हृदय तुमच्या प्रेमाने भरले आहे आणि ही माझी शेवटची पोस्ट आहे. अभिनेता सध्या त्याच्या आगामी ‘लालसिंग चड्ढा’ चित्रपटाच्या चित्रीकरणात आहे.

अलीकडेच ‘मिस्टर परफेक्शनिस्ट ऑफ बॉलिवूड’ने आपला आगामी चित्रपट ‘लालसिंग चड्ढा’ रिलीज होईपर्यंत आपला फोन ‘लॉक’ ठेवण्याचा निर्णय घेतला होता. सेटवर त्याचा मोबाईल सतत वाजल्यामुळे त्याच्या कामावर परिणाम होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी त्याने फोन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियाच्या जगाला निरोप देऊन, आमीरने त्याच्या चाहत्यांना त्यांच्या हँडलवर सतत समर्थन आणि प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद दिले आहेत (Actor Amir Khan Quits Social Media).

काय आहे आमीरची पोस्ट?

आमीर खानने आपले निवेदन प्रसिद्ध करुन म्हटले आहे, ‘मित्रांनो, माझ्या वाढदिवसाच्या माझ्या प्रेमाबद्दल आणि शुभेच्छांबद्दल मनापासून धन्यवाद! माझे हृदय भरून आले आहे. दुसरी बातमी अशी आहे की सोशल मीडियावरील ही माझी शेवटची पोस्ट असेल. तरीही मी या माध्यमावर फारसे सक्रिय नसलो, तरी मी त्यांच्यापासून दूर राहण्याचे निश्चित केले आहे. आपण पूर्वीप्रमाणेच बोलू.’

आमिरने पुढे लिहिले आहे की, ‘यानंतर एकेपीला (आमिर खान प्रॉडक्शन) त्याचे अधिकृत चॅनेल बनवले आहे, तर भविष्यात तुम्हाला त्याच्या चित्रपटांच्या अपडेट्स त्याच्या हँडल @akppl_official वर मिळेल. भरपूर प्रेम.’

2018 मध्ये, आमीरने आपल्या वाढदिवशी आपल्या आईचे छायाचित्र शेअर करून इंस्टाग्रामवर डेब्यू केला होता, ज्यामुळे इंटरनेटवर त्याचा एक नवा फॅन बेस निर्माण झाला होता.

(Actor Amir Khan Quits Social Media)

पाहा आमीरची पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Aamir Khan (@_aamirkhan)

 (Actor Amir Khan Quits Social Media)

हेही वाचा :

Govinda | ‘मीसुद्धा घराणेशाहीचा बळी ठरलो होतो’, रुपेरी पडद्यापासून दूर असणाऱ्या गोविंदाच्या संतापाचा उद्रेक!

कचरा वेचणाऱ्या भावांना मिळाली ‘इंडियन आयडॉल’मध्ये गाण्याची संधी, लोकांनी केले तोंड भरून कौतुक!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI