वरणावरून बिग बॉसच्या घरात राडा, ‘या’ अभिनेत्यावर गंभीर आरोप, थेट खाण्यावरून…

बिग बॉस 19 ला जोरदार सुरूवात झाली आहे. सलमान खान हा शोला होस्ट करत आहे. विशेष म्हणजे बिग बॉसला सुरूवात होऊन 1 आठवडा देखील झालेला नसताना घरात मोठा हंगामा खाण्यावरून होताना दिसतोय.

वरणावरून बिग बॉसच्या घरात राडा, या अभिनेत्यावर गंभीर आरोप, थेट खाण्यावरून...
Bigg boss
| Updated on: Aug 27, 2025 | 1:46 PM

बिग बॉस 19 ला धमाक्यात सुरूवात झालीये. विशेष म्हणजे हे सीजन हीट ठरणार असल्याचे बोलले जातंय. काही नवीन चेहरे या सीजनमध्ये बघायला मिळत आहे. चाहत्यांमध्ये अनुपमा मालिकेतील अभिनेता गाैरव खन्ना याच्याबद्दल क्रेझ बघायला मिळतंय. बिग बॉसला सुरूवात होऊन एक आठवडा देखील पूर्ण झालेला नसताना बिग बॉसच्या घरात मोठा वाद खाण्यावरून झाल्याचे बघायला मिळतंय. चक्क चिकनवरून वाद टोकाला पोहोचलाय. यासोबतच वरणावरूनही वाद झाला.

गाैरव खन्ना याने चार ते पाच वाटी वरण खाल्ल्याचा आरोप घरातील इतर सदस्यांनी केलाय. मात्र, गाैरव खन्ना याने स्पष्ट केले की, मी चार ते पाच वाटी वरण खाल्ले नाही तर मी फक्त एकच वाटी वरण खाल्ले आहे. गाैरव खन्ना ओरडून म्हणतो की, मी सात लोकांचे वरण खाल्ले आहे का? जीशान हा जोरात ओरडून म्हणतो की, आज वरण खूप छान झाले आहे तर तीन ते चार वाटी तूच वरण घेतले. यानंतर गाैरवचा पारा चांगलाच चढतो.

गाैरव म्हणतो की, हा खोटे बोलत आहे. मी तीन ते चार वाटी वरण घेतलेच नाहीये. मी फक्त एक वाटी वरण घेऊन बसलो आहे. गाैरवचे बोलणे ऐकून बसीर देखील त्याच्यावर ओरडताना दिसत आहे. घरातील अनेक सदस्य हे गाैरव खन्नावर वरण जास्त घेतल्याचा आरोप करताना दिसत आहेत. आता बिग बॉसच्या घरात परत एकदा वरणावरून युद्ध होताना दिसत आहे. दरवर्षीच खाण्यावरून वाद होताना दिसतात.

दुसरीकडे चिकनवरून नेहल देखील भडकताना दिसली आहे. अभिषेक आणि बसीर हे दोघे तिला चिकन खाण्यासाठी देताना देखील दिसत आहेत. यासोबतच घरातील काही सदस्य मागे बोलताना म्हणत आहेत की, खाण्यासाठी हिने घरात इतका जास्त धिंगाना करण्याची काहीच गरज नव्हती. मुळात म्हणजे ही पहिली वेळ नाही की, बिग बॉसच्या घरात खाण्यावरून वाद झालाय. नेहमीच मोठी भांडणे खाण्यावरूनच होताना दिसतात.