AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्युनिअर एनटीआर जखमी, चित्रपटाच्या सेटवर मोठी दुखापत, शूटिंग बंद आणि…

अभिनेता ज्युनिअर एनटीआर याच्याबद्दल एक मोठी बातमी येताना दिसत आहे. या बातमीनंतर त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण हे बघायला मिळतंय. चित्रपटाच्या शूटिंगवेळी ज्युनिअर एनटीआर याला मोठी दुखापत झाल्याचे बघायला मिळतंय. हेच नाही तर या अपघातानंतर चित्रपटाचे शूटिंगही थांबवण्यात आलंय.

ज्युनिअर एनटीआर जखमी, चित्रपटाच्या सेटवर मोठी दुखापत, शूटिंग बंद आणि...
Junior NTR
| Updated on: Aug 18, 2024 | 7:46 PM
Share

साऊथचा सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर याचे चित्रपट कायमच धमाका करताना दिसतात. विशेष म्हणजे त्याच्या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये एक मोठी क्रेझ बघायला मिळते. ज्युनिअर एनटीआर याच्या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहतात. काही दिवसांपूर्वीच ‘देवरा’ चित्रपटाचे शूटिंग ज्युनिअर एनटीआर याने संपवले. 27 सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. आरआरआर चित्रपटाचे डायरेक्टर यांनीच हा चित्रपट बनवला आहे. यामुळे हा चित्रपट मोठा धमाका करणार असल्याचे सांगितले जातंय. अभिनेता ज्युनिअर एनटीआर याच्याबद्दल एक अत्यंत मोठी बातमी येताना दिसत आहे. हेच नाही तर ज्युनिअर एनटीआर याचे चाहते चिंतेत आहेत. 

चित्रपटाच्या शूटिंगवेळी ज्युनिअर एनटीआरला मोठी दुखापत झाल्याचे सांगितले जातंय. अॅक्शन सीन शूट करण्यात असताना ही दुखापत ज्युनिअर एनटीआर याला झालीये. ज्युनिअर एनटीआर हा हृतिक रोशनच्या ‘वॉर 2’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे शूटिंग मुंबईमध्ये सुरू होते आणि यादरम्यानच ज्युनिअर एनटीआरला दुखापत झालीये. 

ज्युनिअर  एनटीआर याच्या हाताला ही दुखापत झालीये. यामुळे आता चित्रपटाचे शूटिंगही थांबवण्यात आले. हेच नाही तर डॉक्टरांनी ज्युनिअर एनटीआरला पुढील दोन महिने विश्रांती घेण्याचा सल्ला दिलाय. यावरून हे स्पष्ट होते की, ज्युनिअर एनटीआर याची दुखापत मोठी आहे. ज्युनिअर एनटीआरच्या दुखापतीमुळे चित्रपटाचे शूटिंग लांबणीवर पडले. 

आता हे स्पष्ट आहे की, ज्युनिअर एनटीआरला पुढील दोन महिने चांगला आराम करावा लागेल. आता दोन महिन्यांनंतर म्हणजेच ऑक्टोबरमध्ये चित्रपटाचे शूटिंग परत सुरू होईल. मात्र, ज्युनिअर एनटीआर याच्या दुखापतीमुळे दोन महिने शूटिंग लांबणीवर पडले आहे. याच्या अगोदरही ज्युनिअर एनटीआर याच्या हाताला मोठी दुखापत झाली. 

जिममध्ये व्यायाम करत असताना त्यावेळी ज्युनिअर एनटीआर याच्या हाताल दुखापत झाली होती. त्यावेळी त्याच्या हाताला प्लास्टर होते. देवरा पार्ट 1 बद्दल चाहत्यांमध्ये क्रेझ आहे. या चित्रपटात ज्युनिअर  एनटीआर याच्यासोबतच जान्हवी कपूर, सैफ अली खान हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा अत्यंत महागडा चित्रपट असून तब्बल 150 कोटी रुपये चित्रपटाचे बजेट आहे. 

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...