Movie : प्रभासचा ‘प्रोजेक्ट के’ येण्यासाठी लागणार उशिर, कोणत्या कारणांमुळे चित्रपट रखडला? चित्रपटाच्या सेटवर काय होतायेत चर्चा?

Movie : प्रभासचा 'प्रोजेक्ट के' येण्यासाठी लागणार उशिर, कोणत्या कारणांमुळे चित्रपट रखडला? चित्रपटाच्या सेटवर काय होतायेत चर्चा?
Prabhas and Amitabh Bachchan
Image Credit source: tv9

प्रोजेक्ट के चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाचे किस्से देखील सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, 'बाहुबली' स्टार प्रभास, अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्यातील बाँडिंगचे किस्से चाहत्यांच्या समोर येत असतानाच एक वेगळीच बातमी प्रोजेक्ट के चित्रपटाविषयी समोर आली आहे. हा चित्रपट लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत या तिन्ही ताऱ्यांना प्रोजेक्ट के चित्रपटाच्या शुटिंगसाठी वेळा आणि तारखा जुळवाव्या लागू शकतात.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शुभम कुलकर्णी

Mar 19, 2022 | 10:10 AM

प्रोजेक्ट के चित्रपट (Movie) सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाचे किस्से देखील सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, ‘बाहुबली’ स्टार प्रभास (Actor Prabhas), अभिनेत्री दीपिका पदुकोण (Actress Deepika Padukone) यांच्यातील बाँडिंगचे किस्से चाहत्यांच्या समोर येत असतानाच एक वेगळीच बातमी प्रोजेक्ट के चित्रपटाविषयी समोर आली आहे. प्रभासच्या चाहत्यांना प्रोजेक्ट के चित्रपटासाठी बराच काळ वाट पाहावी लागणार आहे. खरं तर प्रभासच्या या मोठ्या प्रोजेक्टबद्दल काही गोष्टी समोर आल्या आहेत. या थ्रिलर चित्रपटाचे शुटिंग (Film Shooting) एकाच वेळेस पूर्ण होऊ शकणार नाही. यामुळे हा चित्रपट लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. आता चित्रपटाला वेळ लागणार म्हणजे तिन्ही मोठ्या अभिनेत्यांचा वेळ अधिक जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत या तिन्ही ताऱ्यांना प्रोजेक्ट के चित्रपटाच्या शुटिंगसाठी वेळा आणि तारखा जुळवाव्या लागू शकतात.

चित्रपटला का उशिर होणार?

प्रोजेक्ट के हा चित्रपट एका स्ट्रेचमध्ये पूर्ण होऊ शकत नाही. या चित्रपटाचे शूटिंग दर महिन्याला फक्त 7-8 दिवस केले जाईल, असं एका रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय. हा चित्रपट एक साय-फाय थ्रिलर आहे. यामुळे शुटिंसाठी अनेक प्रकारच्या गोष्टी आवश्यक आहेत. यामुळे देखील एकाच वेळी सर्व गोष्टी मिळणे कठीण असून यामुळे चित्रपटाला विलंब होत आहे. चित्रपटावर काम करण्यासाठी महिन्यातून फक्त 7 आणि 8 दिवस असणार आहेत. यामुळे अशा परिस्थितीत आणि चित्रपटाच्या या शेड्यूलनुसार चित्रपट खूप उशिरा तयार होऊ, शकतो असं बोललं जातंय.

प्रभासचे स्वप्न सत्यात

आता आपण चित्रपटाला का वेळ लाणार आहे, याविषयी भरपूर बोललो. आता प्रभासच्या स्वप्नाबद्दल जाणून घ्या. प्रभासचं एक स्वप्न या चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण झाले आहे. या चित्रपटात काम करताना महानायक अमिताभ बच्चन, अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्यासोबत काम करण्याचे प्रभासचे स्वप्न होते. ते आता पूर्ण झाले आहे. याआधी प्रभासचे अनेक किस्सेही समोर आले आहेत. प्रभासने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली ज्यामध्ये प्रभासने बिग बींचे आभार मानले आणि म्हटले, ‘स्वप्न खरे झाले’.

गप्पाटप्पा आणि बरंच काही!

आता तिन्हीही बडे तारे एकाच सेटवर असले की चर्चा तर होणारच. प्रोजेक्ट के चित्रपटाच्या सेटवर महानायक अमिताभ बच्चन आणि प्रभास बराच वेळ एकत्र घालवतात. शुटिंगनंतर एकत्र खाणे, फिरणे आणि गॉसिप करणे या गोष्टी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये करतात. काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांना प्रभासने स्वत: घरचे जेवन आणले होते. यावेळी अमिताभ बच्चन यांनी त्याचे आभार मानले. दरम्यान, प्रभासच्या प्रोजेक्ट के चित्रपटाला उशिर लागत असल्याने चाहत्यांना आणखी वाट पहावी लागेल.

इतर बातम्या

Aurangabad | भाजपाला हरवण्यासाठी MIM महाविकास आघाडीसोबत जाण्यास तयार, Imtiaz Jaleel यांचं मोठं विधान

Badlapur मध्ये धुळवडीच्या दिवशी ह्रदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू

Pune Crime | पुण्यात भामाआसखेड धरणात पोहण्यासाठी उतरले अन… , डोळ्यात देखत बुडाले ; मामे बहिणीसह भावाचा बुडून दुदैवी मृत्यू

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें