AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रावणाची गुहा, अशोक वाटिका.. ‘वाँटेड’ फेम अभिनेत्याने दाखवली श्रीलंकेतील आश्चर्यकारक दृश्ये

प्रदीप काबराचे हे सर्व व्हिडीओ पाहून चाहते थक्क झाले आहेत. 'तुझ्यामुळे आम्हाला हे सर्व पहायला मिळत आहे. मी हे प्रत्यक्षात कधीच पाहिलं नव्हतं, खूप खूप धन्यवाद', असं एकाने लिहिलं. तर 'माझं मन आनंदाने भरून आलं. तुझ्यामुळे आम्हाला हे सर्व पाहण्याची संधी मिळाली', असं दुसऱ्या युजरने म्हटलंय.

रावणाची गुहा, अशोक वाटिका.. 'वाँटेड' फेम अभिनेत्याने दाखवली श्रीलंकेतील आश्चर्यकारक दृश्ये
प्रदीप काबराने दाखवली रावणाची गुहाImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 29, 2026 | 11:22 AM
Share

बॉलिवूड चित्रपटांमध्ये खतरनात व्हिलेन साकारणारा अभिनेता प्रदीप काबरा सध्या श्रीलंकेत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. या ट्रिपदरम्यान त्याने ‘रामायण’ या पौराणिक कथेशी संबंधित काही ठिकाणांना भेट दिली. रावणाची लंका, सीता मातेला ज्याठिकाणी कैद केलं होतं.. अशा सर्व ठिकाणी पोहोचून त्याने चाहत्यांना तिथले व्हिडीओ दाखवले. लाखो वर्षांनंतर आता रावणाची लंका कशी आहे, तिथली दृश्ये कशी आहेत आणि माता सीतेला कोणत्या दुर्गम ठिकाणी लपवून ठेवलं होतं, हे जेव्हा प्रदीप काबराने नेटकऱ्यांना दाखवलं, तेव्हा सर्वजण थक्क झाले.

सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत प्रदीप काबरा म्हणाला, “आजही श्रीलंकेतील प्रत्येक लहान-मोठ्या जागेला रावणाचं नाव दिलं आहे. या जागेचं नाव ‘छोटा रावण धबधबा’ आहे, कारण रावण इथे स्नान करायचा, असं म्हटलं जातं.” हे सांगत असताना प्रदीपने त्या धबधब्याखाली स्नानही केलं. त्यानंतर त्याने रावणाची गुहा दाखवली, जिथे देवी सीतेला सर्वांपासून लपवून कैदेत ठेवण्यात आलं होतं. एला इथं रावणाची ही गुहा आहे. याविषयी प्रदीपने सांगितलं की, “हे इतकं दुर्गम ठिकाण आहे की रावणाने त्यावेळी देवी सीतेला कुठे ठेवलं असेल हे शोधणं खरंच कठीण आहे. मी श्रीलंकेतल्या एका संग्रहालयात गेलो होतो आणि तिथे सापडलेल्या पुराव्यांनुसार रावणाने माता सीतेला आणून एला इथल्या एका गुहेत लपवून ठेवलं होतं. या गुहेचं नाव रावण गुहा असं ठेवण्यात आलं होतं.”

धबधबा-

रावण गुहा-

अशोक वाटिका-

लंका दर्शन-

प्रदीप काबराने अशोक वाटिकेचीही एक झलक दाखवली. हे ठिकाण इतकं सुंदर आहे की याचं वर्णन शब्दांत करता येणार नाही, असं तो म्हणाला. यावेळी प्रदीपने ते झाडही दाखवलं जिथे माता सीता बसत असत आणि जिथे भगवान हनुमानाने त्यांचं दर्शन घेतलं होतं. त्यानंतर त्याने रावणाची लंका दाखवली. वाल्मिकी रामायणानुसार, रावणाची लंका त्रिकुटा पर्वतरांगेत वसलेली होती. पण आता फक्त त्याचे अवशेषच शिल्लक आहेत. एका व्हिडीओमध्ये प्रदीपने महालातील ती जागा दाखवली जिथे रावणाचं सिंहासन होतं आणि जिथे तो बसायचा.

प्रदीप काबराने सलमान खानच्या ‘वाँटेड’पासून ते ‘बँग बँग’, ‘दिलवाले’, ‘सूर्यवंशी’, ‘सिम्बा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय ‘सीआयडी’, ‘क्राइम पेट्रोल’ आणि ‘सावधान इंडिया’सारख्या टीव्ही मालिकांमध्येही त्याने काम केलंय.

Follow Us
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही; १५ ऑगस्ट डेडलाईन
प्रताप सरनाईक: अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही, १५ ऑगस्ट अंतिम तारीख
धीरज परदेशी हत्या प्रकरणात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा जगतापांचा आरोप
धीरज परदेशी हत्या प्रकरण: तपासात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा संग्राम जगतापांचा आरोप
पुण्यातील भोंदू बाबाचा व्हिडिओ व्हायरल: शिष्य पाय धुऊन पाणी पितात
उमेश तागुंदेचा वादग्रस्त व्हिडिओ: शिष्यांकडून पाय धुऊन पाणी पिण्याचा धक्कादायक प्रकार.
बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
Supriya Sule | बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क साधण्याचे दिले निर्देश
राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क वाढवण्याचे निर्देश, पुण्यातील बैठकीत स्पष्टीकरण
पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली...
Pune | पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचं शोषण; आरोपी फरार
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल, रोजगार टिकवण्यासाठी उपाययोजनांची मागणी
भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या...
Pune | भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या विस्तारावर हिंदू महासभेचे आनंद दवे आक्रमक