Bigg Boss 19 : ‘बिग बॉस’ चं विजेतेपद हुकलं, पण प्रणित मोरेचं नशीब फळफळलं, थेट सलमान खानच्या चित्रपटात संधी ?
'बिग बॉस ' चा 19 वा सीझन नुकताच संपला. काल या शोचा ग्रँड फिनाले पार पडला आणि गौरव खन्नाच्या रुपाने नवा विजेता मिळाला. याच समारंभादरम्यान अभिनेता सलमान खानने एक मोठी घोषणा केली. त्याचा किक 2 हा चित्रपट लवकरच येणार आहे. तसेच मराठमोळा प्रणित मोरे याच्याबद्दलही सलमान बोलला.

लोकप्रिय रिॲलिटी शो अर्थात ‘बिग बॉस’ सीझन 19 हा(Bigg Boss 19) नुकताच संपला. अनेक नामवंत सेलिब्रिटी, टीव्ही स्टार, इनफ्लुएन्सर असलेल्या बिग बॉसचं हे पर्वही नेहमीप्रमाणे खूप गाजलं. काल ( 7 डिसेंबर) या शो चा ग्रँड फिनाले पार पडला. टीव्ही अभिनेता गौरव खन्ना (Gaurav Khanna) याच्या नावाची विनर म्हणून घोषणा करण्यात आली. दरम्यान ग्रँड फिनाले सुरू असतानाच बिग बॉसचा होस्ट, अर्थात सलमान खान याने किक 2 या चित्रपटाबद्दल एक मोठी घोषणा केली. त्याचा या चित्रपटाचं काम लौकरच सुरू होणार आहे. एवढंच नव्हे तर या चित्रपटासाठी सलमानहा मराठमोळा कलाकार प्रणित मोरे (Pranit More) याचं नावंही रेकमेंड करणाऱ असल्याचं सलमानने सांगितलं.
किक 2 ची अनाऊन्समेंट
या शोमध्ये प्रणीत मोरेला एलिमिनेशनपूर्वी, त्याला बॅगेजबद्दल विचारण्यात आले. तेव्हा त्याने स्पष्टपणे उत्तर दिलं. ‘माझं एक बॅगेज होतं की मी बॉलिवूडच्या बऱ्या अभिनेत्यांवर जोक करायचो. पण ते बॅगेज मी आता इथेच सोडून जात आगे. ‘ त्यावर सलमान खान म्हणाला, ‘ ते बॅगेज आम्ही रिकामं करू, आम्ही करू. ती तुमची जबाबदारी नाही, ती आम्हा सगळ्यांची जबाबदारी आहे. आता मी किक 2 ( चित्रपट) करतोय, तुझं नाव तर मी 100 टक्के रेकमेंड करेन’ असं सलमान प्रणिताल मनमनोकळेपणे म्हणाला.
2014 साली ‘किक’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. सलमान खानने या चित्रपटात देवी लाल सिंहची भूमिका केली होती. या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला, त्यामुळे चाहते याच्या पार्ट 2 ची अर्थात सिक्वेलटी वाट पहात होते. 4 ऑक्टोबर 2024 रोजी, नाडियादवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटने त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर ‘सिकंदर’च्या सेटवरून सलमान खानचा एक फोटो शेअर केला. त्यामध्ये त्यांनी ‘किक2’ ची घोषणा केली होती.
किकचं बॉक्स ऑफीस कलेक्शन
मात्र आता जवळपास वर्षभरानंतर सलमान खानने किक 2 बद्दल कन्फर्म सांगितलं आहे. हा रवी तेजाच्या 2009 मधील तेलुगू चित्रपटाचा रिमेक होता. ‘किक’मध्ये सलमान खान, जॅकलिन फर्नांडिस, रणदीप हुडा आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. 140 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने 402 कोटी रुपयांची कमाई केली.
सलमानच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तो किक 2 चित्रपट करणार आहेच, पण त्यासोबत त्याच्या हातात द बॅटल ऑफ गलवान हाही चित्रपट आहे. नुकतंच त्याचं शूटिंग पूर्ण झालं. चाहत्यांना या चित्रपटाची मोठी उत्सुकता आहे.
