Guest List : वरुण-नताशाचं लगीन; सलमान ते कतरिना बनणार वऱ्हाडी!

वरुण आणि नताशी अलिबागमध्ये लग्नगाठ बांधणार असल्याची माहिती आहे.(Actor Salman Khan to Katrina will be present at Varun and Natasha's wedding)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:09 PM, 16 Jan 2021
Guest List : वरुण-नताशाचं लगीन; सलमान ते कतरिना बनणार वऱ्हाडी!

मुंबई : वरुण धवन आणि नताशा दलालच्या लग्नाची बातमी खरी ठरली आहे. हे दोघं अलिबागमध्ये लग्नगाठ बांधणार असल्याची माहिती आहे. आता लग्न सोहळ्याच्या डिटेल्स समोर आल्या आहे. सोबतच लग्नात कोण पाहुणे उपस्थित राहणार आणि नताशाचे ब्राइडल आऊटफिट्स कोण डिझाइन करणार, हेही समोर आलं आहे. या दोघांच्या लग्नाचे फंक्शन 5 दिवस चालतील. लग्नसोहळा 22 जानेवारीपासून सुरू होईल आणि 26 जानेवारीपर्यंत चालेल..
पीपिंग मूननं दिलेल्या माहितीनुसार नताशा स्वत:चं ब्राइडल आऊटफिट स्वत: डिझाइन करणार आहे कारण ती स्वत: फॅशन डिझायनर आहे. तर कुणाल रावल हा वरुणचा आऊटफिट डिझाइन करणार आहे.

कार्यक्रमांची यादी
वरुण आणि नताशाच्या लग्नाच्या कार्यक्रमाची सुरुवात संगीत सोहळ्यानं होणार आहे. वरुणचे जवळचे मित्र करण जोहर, मनीष मल्होत्रा, सारा अली खान, अर्जुन कपूर-मलायका अरोरा, जाह्नवी कपूर-खुशी कपूर, कतरिना कैफ, नीतू कपूर, कियारा आडवाणी, अनिल कपूर, रिया कपूर आणि हर्षवर्धन कपूर या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

वरुणची जवळची मित्रीण सोनम कपूर अहूजा ही या लग्नाला उपस्थित राहू शकणार नाहीये कारण ती तिच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग करत आहे आणि ती तिथून आली तरी तिला आधी क्वारंटाइन व्हावं लागणार आहे.

सलमान खानही लग्न सोहळ्याला उपस्थित राहणार
डेव्हिड धवन आणि सलमान खान यांच्यात चांगला बॉन्ड आहे त्यामुळे सलमानही या लग्नाला उपस्थित राहणार आहे. त्याचबरोबर करण जोहर संगीतमध्ये परफॉर्मंस देणार आहे.

सनसेट वेडिंग
मिळालेल्या माहितीनुसार वरुण आणि नताशाचं लग्न सूर्यास्तावेळी व्हावं अशी त्यांची इच्छा आहे, त्यामुळे अलिबाग बीचमध्ये सूर्यास्ताच्या वेळी लग्नानंतर पाहुण्यांसाठी रिसेप्शन डिनरचं आयोजन करण्यात आलं आहे. डेव्हिड धवनचे मित्रही या रिसेप्शनसाठी उपस्थित राहणार आहेत.

संबंधित बातम्या 

वरुण धवन आणि नताशा दलालच्या लग्नाची नवी तारीख समोर, स्थळंही ठरलं!

Kangana Ranaut | राजीव मसंद यांची ‘धर्मा प्रोडक्शन’मध्ये वर्णी, संतापलेल्या कंगनाची टीका!