AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आईसाठी… बापासाठी… पोरासाठी… मुलासाठी… आयटमसाठी… झाड लाव झाड लाव… सयाजी शिंदेंच्या ‘झाडखाऊ’ रॅपचा धुमाकूळ

Video: सध्या सोशल मीडियावर अभिनेते सयाजी शिंदे यांचे 'झाडखाऊ' हा रॅप धुमाकूळ घालत आहे. तुम्ही हे गाणे पाहिले का? नसेल पाहिले तर नक्की पाहा...

आईसाठी... बापासाठी... पोरासाठी... मुलासाठी... आयटमसाठी... झाड लाव झाड लाव... सयाजी शिंदेंच्या 'झाडखाऊ' रॅपचा धुमाकूळ
Sayaji ShindeImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Dec 15, 2025 | 6:19 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी तोडल्या जाणाऱ्या झाडांना मोठा विरोध होत आहे. त्यासाठी अभिनेते सयाजी शिंदे यांनी ठाम भूमिका घेतली होती. तसेच तपोवनासाठी तोडल्या गेलेल्या झाडांमुळे राजकीय आणि सामाजिक वातावरण प्रचंड तापले आहे. आता या वादावर सयाजी शिंदे यांनी एक रॅप सॉंग तयार केले आहे. हे रॅप साँग सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. काय आहे हे रॅप साँग एकदा पाहा…

काय आहे गाणे?

सयाजी शिंदे यांनी त्यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर नवे रॅप साँग शेअर केले आहे. या रॅप साँगचे नाव ‘झाडखाऊ’ आहे. या गाण्यात सयाजी शिंदे यांच्यासोबत गणेश आचार्य दिसत आहे. तसेच आईसाठी… बापासाठी… पोरासाठी… मुलासाठी… आयटमसाठी… झाड लाव झाड लाव असे या रॅप साँगचे बोल आहेत. सयाजी शिंदे यांनी स्वत: हे रॅप लिहिले आहे. या रॅप साँगला सयाजी शिंदे, गणेश आचार्य आणि शैलेंद्र यांनी आवाज दिला आहे. गाण्यामध्ये सयाजी शिंदे यांचा अनोखा अंदाज पाहायला मिळत आहेत. त्यांनी पांढऱ्या रंगची जिन्स, टी-शर्ट आणि त्यावर पांढरे जॅकेट घातले आहे. त्यासोबतच पांढऱ्या रंगाचे शूज देखील घातले आहेत. तसेच हे गाणे एका झाडाखाली देखील शूट केल्याचे दिसत आहे.

वाचा: कधीकाळी मुंबईचा डॉन, त्याचीच सुंदर मुलगी आता मागतेय भीक, त्या राजकुमारीवर अशी वेळ का आली?

नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स

सध्या सोशल मीडियावर सयाजी शिंदे यांचे हे रॅप साँग चांगलेच व्हायरल झाले आहे. नेटकऱ्यांनी या रॅप साँगवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. एका यूजरने खुप छान भाऊ तुम्ही आमच्यासाठी एक प्रेरणेची ज्योत आहेत आणि ती सदैव ह्या सृष्टीला तेजोमय करत रहावी हीच इच्छा अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने तुमच्या प्रयत्नांना सलाम सर, तुमच्या वृक्षलागवड मोहिमेत सहभागी होण्यासाठी कुठे कसं कॉन्टॅक्ट करायचं याची माहिती सार्वजनिक केलीत तर लाखो तरुण मंडळी तुमच्या सोबत काम करायला इच्छुक आहेत असे म्हटले आहे. तिसऱ्या एका यूजरने एकच नंबर सयाजी शिंदे असे म्हणत कमेंट केली आहे. इतर यूजरने देखील सयाजी शिंदे यांना कमेंट्स करत पाठिंबा दिला आहे.

मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.
ठाकरेंना जय महाराष्ट्र अन् भाजपात प्रवेश, तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या...
ठाकरेंना जय महाराष्ट्र अन् भाजपात प्रवेश, तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या....
संगमनेरमध्ये बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांविरोधात जनआक्रोश, मागणी काय?
संगमनेरमध्ये बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांविरोधात जनआक्रोश, मागणी काय?.