VIDEO : शाहरुख खानच्या मुलीची एण्ट्री, पहिली शॉर्ट फिल्म प्रदर्शित

बॉलिवूडचा किंग अर्थात सुपरस्टार शाहरुख खानची मुलगी सुहाना खानने (Suhana khan debut short film) विदेशी शॉर्ट फिल्ममधून सिनेसृष्टीत डेब्यू केला आहे.

VIDEO : शाहरुख खानच्या मुलीची एण्ट्री, पहिली शॉर्ट फिल्म प्रदर्शित

मुंबई : बॉलिवूडचा किंग अर्थात सुपरस्टार शाहरुख खानची मुलगी सुहाना खानने (Suhana khan debut short film) विदेशी शॉर्ट फिल्ममधून सिनेसृष्टीत डेब्यू केला आहे. सुहाना खानने शॉर्ट फिल्ममधून आपल्या करिअरला सुरुवात केली आहे. ‘The Grey Part of Blue’ असं या शॉर्ट फिल्मचे (Suhana khan debut short film) नाव आहे. युट्यूबवरील ‘Theodore Gimeno’ या चॅनेलवर ही शॉर्ट फिल्म प्रदर्शित केली आहे.

या सिनेमात सुहान एका सँडी नावाच्या भूमिकेत दिसत आहे. सँडी आपल्या बॉयफ्रेंडला (रोबिन गोनेला) आपल्या आई-बाबांना भेटवण्यासाठी खूप उत्सुक असते. दहा मिनिट पाच सेकंदाच्या या सिनेमात सँडी आणि तिचा बॉयफ्रेंड एका प्रवासात जाताना दिसत आहेत. या प्रवासादरम्यान दोघांना समजते की त्यांचे नाते एका चांगल्या मोडपर्यंत पोहचलेले नाही. दोघे एकमेकांसाठी बनले नसून त्यांचे नाते पुढे जाऊ शकत नाही, असं या शॉर्ट फिल्ममध्ये दाखवले आहे. या सिनेमात आपल्याला फक्त सँडी आणि तिच्या बॉयफ्रेंडची भूमिका दिसत आहे.

हा सिनेमा पाहून स्पष्ट होत आहे की, सुहानाची अॅक्टिंग उत्कृष्ट आहे. या फिल्ममध्ये अनेक असे दृश्य आहेत ज्यामध्ये सुहाना आपल्या डोळ्यांच्या हावभावावरुन सर्व काही बोलत असल्याचे दिसत आहे. तिचे एक्सप्रेशनही अप्रतिम आहेत. विशेष म्हणजे फिल्ममधील प्रत्येक लोकेशन, म्युझिक जे चित्रपटाला आणखी शानदार बनवत आहे.

दरम्यान, सुहाना खान सध्या न्यूयॉर्क विद्यापीठातून शिक्षण घेत आहेत. नुकतेच शाहरुख खानला एका मुलाखतीमध्ये सुहानाच्या फिल्मी करिअरबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावर शाहरुखने सांगितले होते की, माझी मुलगी अभिनय जगात येणार पण तिचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर येईल. तसेच सुहानाला तीन-चार वर्ष अभिनय क्षेत्रात ट्रेनिंग घेण्याची गरज आहे.


Published On - 4:00 pm, Mon, 18 November 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI