AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunny Deol : 200 कोटींचा मालक, पण पायातले बूट मात्र.. सनी देओलचा VIDEO पाहून चाहते थक्क

Sunny Deol : अभिनेता सनी देओल आणि अक्षय खन्नाची प्रमुख भूमिका असलेल्या 'इक्का' फिल्मचा काल धमाकेदार ट्रेलर लांच सोहळा झाला. या दरम्यन चित्रपटाची अख्खी स्टारकास्ट उपस्थित होती, पण ज्या गोष्टीने लोकांचं सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे सनी देओलचे बूट... असं काय होत त्यात ?

Sunny Deol : 200 कोटींचा मालक, पण पायातले बूट मात्र.. सनी देओलचा VIDEO पाहून चाहते थक्क
ट्रेलर लाँच इक्काचा, पण सगळ्यांचं लक्ष वेधले सनी देओलच्या बुटाने
| Updated on: Jun 30, 2026 | 9:42 AM
Share

Sunny Deol Shoes Video : 200 कोटींपेक्षा अधिक संपत्ती असलेलाल आणि बॉलीवूडचा ॲक्शन हिरो सनी देओल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सनी देओल आणि अक्षय खन्ना यांच्या आगामी ‘इक्का’ चित्रपटाची सध्या बरीच हवा आहे. याच चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला असून चाहत्यांना त्याची खूप उत्सुकता आहे. या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये सनी देओल आणि संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित होती. मात्र या इव्हेंटमध्ये सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतलं ते सनी देओलच्या बुटांनी. त्याच्या बुटाचे फोटो, व्हिडीओ अनेकांच्या व्हिडीओत कैद झाले आणि सगळीकडे त्याचीच चर्चा सुरू आहे. असं काय होतं सनीच्या त्या बुटांमध्ये ?

अभिनेता सनी देओलच्या ‘इक्का’ (Ikka) चित्रपटाच्या ट्रेलर लाँचदरम्यानचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, परंतु त्यातील एक विशिष्ट व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये सनी देओल याने जुने आणि जीर्ण झालेले बूट घातलेले दिसले. त्याच्या बुटाचा खालचा भाग हा फाटत आला होता. पाहता पाहता ते कॅमेऱ्यात कैद झालं आणि व्हायरलही झालं. ही बाब अनेक लोकांच्या लक्षात आली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, चाहत्यांमध्ये त्यावरून चर्चेला उधाण आलं आहे, काहींनी तर त्यावरून सनीच्या साधेपणाचं कौतुकही केलं.

सनी देओलचा बूट

अभिनेता सनी देओल पुन्हा एकदा चर्चेत आलाय, पण यावेळी त्यामागचं कारण एखादा चित्रपट नव्हे, तर त्याचा पेहराव आहे. ‘इक्का’ (Ikka) चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याला सनी देओल हा असे बूट घालून आला होता, जो खालच्या बाजूला फाटलेला होता; कदाचित ते त्याच्या लक्षातही आलं नसेल पण लाँच इव्हेंट दरम्यान अनेक लोकांनी हे नोटीस केलं आणि पाहता पाहता सोशल मीडियावरील लोकांचंही या गोष्टीने लक्ष वेधून घेतलं. तो व्हिडीओ व्हायरल झाला असून तो पाहिल्यानंतर अनेकांनी विविध कमेंट्स दिल्या आहेत. प्रचंड श्रीमंत असूनही सनी पाजी किती साधेपणाने वागतात, असं म्हणत काहींनी सनी देओल याचं कौतुक केलंय. तर काही युजर्सनी कमेंट्समध्ये असा अंदाज वर्तवला की, त्याने घातलेले बूट हे प्रत्यक्षात त्याचे वडील धर्मेंद्र यांचे असून, सनी याने ते केवळ त्या कार्यक्रमासाठी घातले होते.

सनी देओलचा इक्का

आपल्या साधेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्य़आ सनी देओल याच्याकडे ‘गुच्ची’ (Gucci) सारख्या ब्रँड्सचे महागडे स्नीकर्सही आहेत, ज्यांची किंमत साधारण 62 हजारांपर्यंत असल्याचे सांगितले जाते. ‘इक्का’ (Ikka) या चित्रपटाबद्दल सांगायचे तर, हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित न होता 10 जुलै 2026 रोजी डायरेक्ट नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थ पी. मल्होत्रा ​​दिग्दर्शित या कोर्टरूम ड्रामामध्ये सनी देओल याच्यासोबत अक्षय खन्नाही प्रमुख भूमिकेत दिसणार असून तो पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात