Sushant Singh Rajput | गाड्यांपासून मोबाईलपर्यंत एकच नंबर, सुशांतच्या लकी नंबरच्या गाड्यांचा लवकरच लिलाव?

सुशांत याच्या सर्व गाड्यांचे नंबर हे 4747 असे आहेत. हा नंबर सुशांतचा लकी नंबर असल्याचं त्याचे जवळचे सांगतात.

Sushant Singh Rajput | गाड्यांपासून मोबाईलपर्यंत एकच नंबर, सुशांतच्या लकी नंबरच्या गाड्यांचा लवकरच लिलाव?

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर (Sushant Singh Rajput Vehicle Auction) आता त्याच्या गाड्यांचा लिलाव होण्याची शक्यता आहे. सुशांतच्या गाड्या विकत घेण्यासाठी काही जण प्रयत्नशील आहेत. सुशांतने तीन गाड्या घेतल्या होत्या. या गाड्यांची बाजार भावाने किंमत सध्या दीड कोटी रुपये आहे. ही गाड्यांची रिसेल किंमत आहे (Sushant Singh Rajput Vehicle Auction).

4747 सुशांतचा लकी नंबर

सुशांतच्या सर्व गाड्यांचे नंबर हे 4747 असे आहेत. हा नंबर सुशांतचा लकी नंबर असल्याचं त्याचे जवळचे सांगतात. 2014 पासून सुशांत 4747 हा नंबर निवडायचा. मोबाईल, गाडी आणि वैयक्तिक पातळीवरही तो हाच नंबर वापरत होता.

 

View this post on Instagram

 

In the fight between you and the world, back the world. ~ #kafka #kafkaesque ❤️

A post shared by Sushant Singh Rajput (@sushantsinghrajput) on

सुशांत आता आपल्यात नाही. यामुळे त्याचे कुटुंबीय या गाड्यांचा लवकरच लिलाव करण्याची शक्यता आहे. या गाड्या घेण्यासाठी काही जण प्रयत्न करत आहेत. सुशांत यांच्या जवळच्या लोकांशी संपर्क करत आहेत (Sushant Singh Rajput Vehicle Auction).

सुशांत सिंह राजपूतची राहत्या घरी आत्महत्या

सुशांत सिंह राजपूत याने रविवारी (14 जून 2020) मुंबईतील वांद्रे इथल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्यामुळे पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र, सुशांतच्या मृत्यूबाबत त्याच्या कुटुंबाने आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे पोलिसांनी याबाबत तपास सुरु केला. सुशांत सिंह राजपूत आत्महत्येचा तपास वांद्रे पोलीस, सायबर सेल, फॉरेन्सिक विभाग आणि मुंबई क्राईम ब्रांचकडून होत आहे (Sushant Singh Rajput Vehicle Auction).

संबंधित बातम्या :

Bollywood Celebrities | 2020 च्या सहा महिन्यात मनोरंजन विश्वाने गमावले 20 हिरे!

Sushant Singh Suicide Investigation | अभिनेत्री संजना संघीची 9 तास चौकशी, ‘मी टू’च्या कथित आरोपांवर प्रश्न

‘तुझ्या दु:खाला जबाबदार कोण याची मला कल्पना’, सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणी शेखर कपूर यांचाही जबाब होणार : सूत्र

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *