‘तुझ्या दु:खाला जबाबदार कोण याची मला कल्पना’, सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणी शेखर कपूर यांचाही जबाब होणार : सूत्र

'तुझ्या दु:खाला जबाबदार कोण याची मला कल्पना', सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणी शेखर कपूर यांचाही जबाब होणार : सूत्र

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी यावर वक्तव्यं केली (Shekhar kapoor on Sushant Suicide).

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Jun 30, 2020 | 10:45 PM

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी यावर वक्तव्यं केली (Shekhar kapoor on Sushant Suicide). यात अभिनेते आणि दिग्दर्शक शेखर कपूर यांनीदेखील ट्विटरवर सुशांतच्या आत्महत्येवर दु:ख व्यक्त केलं. तसेच त्याच्या दुःखाला कोण जबाबदार आहे याची कल्पना असल्याचं म्हटलं. त्यामुळे मुंबई पोलिसांकडून आता त्यांचाही जबाब नोंदवला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे शेखर कपूर आपल्या जबाबात काय माहिती देतात याकडे अनेकांचं लक्ष आहे.

शेखर कपूर यांनी ट्विट करत म्हटलं होतं, “तू ज्या परिस्थितीतून, तणावातून जात होता त्याची मला जाणीव होती. ज्या लोकांनी तुला कमजोर बनवलं, ज्यांच्यामुळे तू माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडलास, त्या सर्वांची गोष्ट मला ठावूक आहे. गेल्या सहा महिन्यात तुझ्यासोबत एकत्र राहायला हवं होतं, तू निदान माझ्याशी बातचीत तरी केली असतीस. जे काही झालं, ते सर्व इतरांचे कर्म होते, तुझे नाही.” (Shekhar kapoor on Sushant Suicide).

सुशांत सिंहच्या आत्महत्येने देशभरात खळबळ माजली होती. तसेच त्याच्या आत्महत्यविषयी देखील तर्कवितर्क लावले जात होते. यातच शेखर कपूर यांच्या या ट्विटने चर्चेला उधाण आले होते. त्यानंतर शेखर कपूर यांना सुशांतच्या आत्महत्येविषयी नेमकी कोणती माहिती होती याविषयी देखील मोठी चर्चा रंगली. आता अखेर मुंबई पोलिसांनी सुशांतच्या आत्महत्येमागील कारणांचा उलगडा करताना शेखर कपूर यांचा जबाबही नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे. सुशांतने आत्महत्येपूर्वी कोणतीही सुसाईड नोट न लिहिल्याने या कारणांविषयी अनेक तर्क लावले जात आहेत. मात्र, नेमकं कारण अजूनही पुढे आलेले नाही. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या तपासात नेमकी कोणती कारणं पुढे येतात हे पाहावे लागणार आहे.

दरम्यान, सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील मोठे दिग्दर्शक त्याच्याकडे पाठ फिरवत असल्याने तो दु:खी होता, अशीही चर्चा झाली. मात्र, या गोष्टींचा कुठलाही पुरावा अद्याप समोर आलेला नाही. शेखर कपूर आणि सुशांत सिंह राजपूतने ‘पाणी’ या चित्रपटात सोबत काम करण्याचं निश्चित केलं होतं. या चित्रपटाची घोषणा ‘कान्स’ फिल्म फेस्टिवलमध्ये करण्यात आली होती. अभिनेता ऋतिक रोशन सोबत हा चित्रपट करावा, अशी शेखर कपूर यांची इच्छा होती. मात्र, ‘मोहेंजोदडो’ चित्रपटाच्या चित्रिकरणामुळे ऋतिक या प्रोजेक्टचा भाग बनू शकला नाही. याशिवाय शेखर कपूर या चित्रपटासाठी हॉलिवूड स्टारची निवड करणार होते. मात्र, शेवटी त्यांनी सुशांतची निवड केली.

सुशांतने या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत केली, असं शेखर कपूर यांनी सांगितलं होतं. मात्र, या चित्रपटाच्या प्रोजेक्टसाठी यशराज सारख्या मोठ्या बॅनरने नकार दिला तेव्हा सुशांत नाराज झाला. दरम्यान, सुशांतच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर चित्रपट निर्माते करण जोहर, अभिनेत्री आलिया भट यांना ट्रोल केलं गेलं. सुशांत स्टार किड नसल्याने इंडस्ट्रीमध्ये त्याला नेपोटिझमचा (घराणेशाहीचा) सामना करावा लागला, असाही आरोप लोकांकडून केला गेला.

हेही वाचा :

Sushant Singh Rajput suicide l बॉलिवूडमधील दुश्मनीची बाजूही तपासणार, गृहमंत्र्यांचा थेट इशारा

Sushant Singh Rajput Suicide | सुशांतसोबत माजी मॅनेजरच्या आत्महत्येचाही नव्याने तपास, मैत्रीण रियाचाही जबाब घेणार

यशराज फिल्म्स, सलमान खानने अनेकांना उद्ध्वस्त केलं, सुशांतच्या आत्महत्येची चौकशी करा : दबंगच्या दिग्दर्शकाची मागणी

Shekhar kapoor on Sushant Suicide

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें