Sushant Singh Suicide Investigation | अभिनेत्री संजना संघीची 9 तास चौकशी, ‘मी टू’च्या कथित आरोपांवर प्रश्न

संजनाच्या दाव्यानुसार तिने सुशांतसिंह राजपूतवर कोणत्याही प्रकारचा आरोप केला नव्हता किंवा अशी कोणतीही घटना घडली नव्हती. (Sushant Singh Rajput Suicide Investigation Actress Sanjana Sanghi Inquiry)

  • सुधाकर काश्यप, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 14:42 PM, 1 Jul 2020
Sushant Singh Suicide Investigation | अभिनेत्री संजना संघीची 9 तास चौकशी, 'मी टू'च्या कथित आरोपांवर प्रश्न

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ‘दिल बेचारा’ या चित्रपटातील त्याची सहकलाकार आणि अभिनेत्री संजना संघी हिचा जबाब नोंदवण्यात आला. मुंबई पोलिसांनी संजनाची 9 तास चौकशी केली. (Sushant Singh Rajput Suicide Investigation Actress Sanjana Sanghi records Statement)

चौकशीत मुंबई पोलिसांनी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सुशांतवर ‘मीटू’ प्रकरणात झालेले आरोप, चित्रीकरण सुरु असताना त्याला डिप्रेशन आले होते का, असे अनेक महत्त्वाचे प्रश्न संजना संघी हिला विचारण्यात आले.

अभिनेत्री संजना संघीचा जबाब काय?

“2018 मध्ये ‘दिल बेचारा’ या चित्रपटाच्या ऑडिशननंतर मला कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांनी निवडलं होतं. छाब्रा हे या चित्रपटाचे दिग्दर्शकही होते. मला नंतर समजले, की या चित्रपटात सुशांतसिंह राजपूतची मुख्य भूमिका आहे. चित्रपटाच्या सेटवरच मी सुशांतला पहिल्यांदा भेटले” असं संजनाने सांगितलं.

संजनाच्या दाव्यानुसार तिने सुशांतसिंह राजपूतवर कोणत्याही प्रकारचा आरोप केला नव्हता किंवा अशी कोणतीही घटना घडली नव्हती.

“2018 मध्ये जेव्हा मीटू मोहीम सुरु होती, तेव्हा कुणीतरी अशी आवई उठवली की, शूटिंग दरम्यान सुशांतने चुकीच्या पद्धतीने मला हात लावला, मात्र तसं काही झालंच नव्हतं. पण मला याबद्दल त्यावेळी काहीच माहिती नव्हती. मी आईबरोबर अमेरिकेला गेले होते. चित्रपटाच्या एका भागाचं शूटिंग झालं होतं. माझं शूट नसल्याने मी फिरायला गेले होते.” अशी माहिती संजनाने दिली.

हेही वाचा : यशराजचा ‘तो’ सिनेमा आपटला, तरीही सुशांतला 40 लाख जास्त का?

“मी परदेशी असताना माझ्या अपरोक्ष माझ्या नावाने सुशांतसिंह याच्याविरोधात अनेक आरोप होत होते. सोशल मीडिया, वृत्तपत्र आणि टीव्हीवरुन त्याच्यावर आरोप होत होते. ब्लाइंड स्पॉट्सच्या माध्यमातून सुशांतवर आरोप होत होते. पण मी कोणताही आरोप केला नव्हता.” असे स्पष्टीकरण संजनाने दिले.

“मी अमेरिकेहून परत आल्यावर मला सर्व गोष्टी समजल्या. ते सर्व चुकीचं होतं. त्यामुळे मी त्याबाबत सोशल मीडियावर खुलासाही केला होता. सुशांतवर चुकीचे आणि खोटे आरोप होत असल्याचं म्हटलं होतं.” असं संजनाने जबाबात सांगितलं.

“मी सुशांत आणि मुकेश दोघांनाही भेटले. या घटनेमुळे सुशांत खूप नैराश्यात आला होता. मीटू मोहिमेच्या माध्यमातून आपली बदनामी सुरु आहे. आपल्याला ट्रोल केलं जात आहे” असं सुशांत मला सांगत असल्याचं संजना म्हणाली.

(Sushant Singh Rajput Suicide Investigation Actress Sanjana Sanghi records Statement)