कतरीनासोबत लग्न झाल्याचा आनंद, धनुषच्या ‘राउडी बेबी’वर विकी कौशलचा भन्नाट डान्स

vicky kaushal dance विकी कौशलचा एक डान्स व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये विकी कौशल दक्षिणेचा सुपरस्टार धनुषच्या सुपरहिट राऊडीबेबी गाण्यावर थिरकताना दिसत आहे.

कतरीनासोबत लग्न झाल्याचा आनंद, धनुषच्या 'राउडी बेबी'वर विकी कौशलचा भन्नाट डान्स
Katrina Kaif And Vicky Kaushal

मुंबई : अभिनेता विकी कौशल (vicky kaushal) कतरीना कैफसोबत (Katrina Kaif) लग्न केल्यापासून कमालीचा आनंदी दिसत आहे. तो आभाळाएवढा आनंद त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे तो आपल्या फॅन्ससोबत वारंवार शेअर करतोय. विकी कौशलचा एक डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हिडीओमध्ये विकी कौशल दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषच्या सुपरहिट राऊडीबेबी गाण्यावर थिरकताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये विकी भन्नाट स्टेप्स करत आपल्या चाहत्यांचं पुरेपुर मनोरंजन करतोय.

कतरीना आणि विकीने 9 डिसेंबर रोजी लग्नगाठ बांधली. आपल्या 6 वर्षांच्या करिअरमध्येच विकीने कतरीनाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि पुढच्या काहीच महिन्यात सगळ्यांना 440 व्होल्टचा करंट देत राजस्थानच्या अलिशान महालात लग्नही केलं. तेव्हापासून खरं तर नेटकरी विकी कौशल आणि कतरीनाच्या पोस्टवर संमिश्र कमेंट करताहेत. आताही विकीच्या डान्सवर कमेंट करताना नेटकऱ्यांनी कतरीनाला डोळ्यासमोर ठेऊन विकीला टोमणे मारलेत. कतरीनासोबत लग्न केल्यापासून एवढा खूश दिसत आहे, जो आनंद व्हिडीओतून आम्हाला दिसतोय, अशा कमेंट नेटकऱ्यांनी विकीच्या व्हिडीओवर केल्या आहेत.

असं असलं तरी, लग्नानंतर विकी कौशल त्याच्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त झाला आहे. विकीने हा व्हिडिओ त्याच्या सेटवरुन चाहत्यांसोबत शेअर केला आहे. दरम्यान, विकीला थोडा मोकळा वेळ मिळाला त्यातूनही त्याने आपल्या क्रिएटिव्हीटीची झलक दाखवली. दुसरीकडे चाहत्यांनी विकीच्या डान्सला कतरिनाचं कनेक्शन जोडायला सुरुवात केली आहे.

विक्की कौशलने याआधी कतरिनासोबतचा एक फोटो शेअर केला होता जो त्यांच्या लग्नाच्या फंक्शनचा होता. फोटोत, विकी कॅट एकत्र डान्स करताना दिसत आहे. याच फोटोला कॅप्शन देताना विकीने लिहिलं आहे की, ‘कायमचे एकत्र.’ ख्रिसमसच्या मुहूर्तावरही विकीने पत्नी कतरिनासोबतचा एक फोटो शेअर केला असून त्यात त्याने चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. फोटोमध्ये विकी कॅट एकमेकांना मिठी मारताना दिसत आहे.

राजस्थानपासून मुंबईपर्यंतच्या विकी कॅटच्या फोटोंची सर्वत्र चर्चा

विकी आणि कतरीनाने शाही पद्धतीने विवाह केला. त्यांच्या लग्नाचे अनेक सुंदर फोटो चाहत्यांना पहायला मिळाले. त्यांच्या लग्नाला काही मोजकीच मंडळी उपस्थित होती. लग्नाच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडला. काही जणांनी तर भन्नाट मीम्सही बनवले. बॉलिवूडमधलं हे शाही लग्न गेल्या काही दिवसात चांगलंच चर्चेत राहिलं.

संबंधित बातम्या-

Celibrities corona update: हृतिक रोशनची पूर्व पत्नी सुझेन खान आणि कॉमेडियन वीरदास कोरोना पॉझिटिव्ह, सेलिब्रिटी कोरोनाच्या गर्तेत

Lata Mangeshkar COVID | गानकोकिळा लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण, आयसीयूमध्ये दाखल

सारा अली खानच्या हाती ट्रॅक्टरचं स्टेरिंग, खांद्यावर काठी अन् बाजूला मेंढ्या… नवाबच्या लेकीचा देसी अंदाज

Published On - 1:26 pm, Tue, 11 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI