सारा अली खानच्या हाती ट्रॅक्टरचं स्टेरिंग, खांद्यावर काठी अन् बाजूला मेंढ्या… नवाबच्या लेकीचा देसी अंदाज

अभिनेत्री सारा अली खान सध्या तिच्या हटके फोटोजमुळे चर्चेत आली आहे. हातात काठी आजूबाजूला मेंढ्यांचा कळप... असा फोटो साराने शेअर केला आहे. तिने शेअर केलेल्या देसी अंदाजातले फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरताना दिसत आहेत.

सारा अली खानच्या हाती ट्रॅक्टरचं स्टेरिंग, खांद्यावर काठी अन् बाजूला मेंढ्या... नवाबच्या लेकीचा देसी अंदाज
sara ali khan

Bollywood Actress Sara ali khan: अभिनेत्री सारा अली खान नेहमीच तिच्या हटके स्टाईलमुळे चर्चेत असते. साराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेले फोटो सध्या चर्चेत आहेत. सारा सध्या उत्तर प्रदेशमध्ये आहे. हातात काठी आणि मेंढ्यांचा कळप… तिचे हे देसी अंदाजातले फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरताना दिसताहेत.

साराने एका मेंढपाळा सोबतचा एक फोटो शेअर केलाय. तर एका फोटोमध्ये ती ट्रॅक्टर चालवताना दिसतेय. या हटके फोटोंसोबत साराने या फोटोंना दिलेलं कॅप्शनही लक्षवेधी आहे. मेंढ्यांना चरायला घेऊन जाणं, ट्रॅक्टर चालवणं हा फक्त फोटो काढण्यासाठीचा खटाटोप आहे की साराला खरंच त्या जमान्यात जायचंय? असं कॅपशन साराने दिलंय.

सारा अली खान नवाब सैफ अली खानची मुलगी आहे. पण एवढ्या मोठ्या घराण्याचा वारसा असताना तीचं साधं राहणं आणि चाहत्यांना भावतं.

सारा अली खानने ‘केदारनाथ’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं आणि आता ती बॉलिवूडच्या टॉप हिरॉईन्समध्ये गणली जाते. आणि नुकतंच साराचा अतरंगी रे चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातली तिने धनुष, आणि अक्षय कुमारसोबतची साराची केमेस्टी प्रेक्षकांना भावली.

संबंधित बातम्या-

Birthday Special : टीव्हीवरील मालिकेने करिअरची सुरुवात करणारी आम्रपाली दुबे आज बनली सुपरस्टार!

शाहरुख खानचा बंगला बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण!

Bigg Boss 15 : तेजस्वीला बोलताना पुन्हा एकदा करण कुंद्राची जीभ घसरली, म्हणाला…

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI