शाहरुख खानचा बंगला बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण!

शाहरुख खानने (Shahrukh khan) आपल्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. शाहरूखचा मुंबईमधील बंगला मन्नत (Mannat) अत्यंत प्रसिध्द आहे. 6 जानेवारी 2022 रोजी महाराष्ट्र पोलिस नियंत्रण कक्षाला एक फोन आला होता आणि शाहरुख खानचा बंगला मन्नतला उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती.

शाहरुख खानचा बंगला बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण!
शाहरुख खान

मुंबई : शाहरुख खानने (Shahrukh khan) आपल्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. शाहरूखचा मुंबईमधील बंगला मन्नत (Mannat) अत्यंत प्रसिध्द आहे. 6 जानेवारी 2022 रोजी महाराष्ट्र पोलिस नियंत्रण कक्षाला एक फोन आला होता आणि शाहरुख खानचा बंगला मन्नतला उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. आता पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे.

मन्नत बंगला उडवण्याची धमकी

पोलिसांनी आरोपीला मध्य प्रदेशातील जबलपूर येथून अटक केली आहे. जितेश ठाकूर असे या व्यक्तीचे नाव आहे. 6 जानेवारी 2022 रोजी जितेशने महाराष्ट्र पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून शाहरुखचा बंगला बॉम्बने उडवणार असल्याची धमकी दिली होती. यामध्ये त्याने शाहरुखच्या बंगल्यासह मुंबईतील विविध ठिकाणी दहशतवादी हल्ले आणि बॉम्बस्फोट करणार असल्याची देखील धमकी दिली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

मुंबई पोलिसांनी कॉल ट्रेस केला आणि तो नंबर मध्य प्रदेशातील जबलपूरचा असल्याचे पोलिसांना समजले. सीएसपी आलोक शर्मा म्हणाले, “आम्हाला महाराष्ट्र पोलिसांकडून कॉल आला की जबलपूरमधून दहशतवादी हल्ला करण्याचा काॅल आला आहे. त्या व्यक्तीला अटक करण्यासाठी त्यांनी आमची मदत घेतली. आम्ही त्या व्यक्ती अटक केली आहे आणि भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.”

धमकी देणाऱ्या आरोपीला अटक

जबलपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक गोपाल खंडेल यांनी पीटीआयला सांगितले की, महाराष्ट्र पोलिसांनी एक मोबाईल नंबर शेअर केला होता, ज्याच्या आधारे जितेश ठाकूरला अटक करण्यात आली आहे. खंडेल यांनी सांगितले की, आरोपीला दारूचे व्यसन असून त्याने यापूर्वीही खोटे कॉल करून पोलिसांच्या एसओएस सेवेच्या डायल 100 या कर्मचाऱ्यांशी भांडण केले होते. फोन केल्यानंतर अनेक ठिकाणी झडती घेण्यात आली.

संबंधित बातम्या : 

Bigg Boss 15 : तेजस्वीला बोलताना पुन्हा एकदा करण कुंद्राची जीभ घसरली, म्हणाला…

Aamir Khan’s Daughter | सलग 15 दिवस आमीरच्या मुलीचा उपवास! वजन घटलं की वाढलं? उत्तर इरा खानने दिलंय


Published On - 9:20 am, Tue, 11 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI