AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vikram: छातीत दुखू लागल्याने अभिनेता विक्रमला रुग्णालयात केलं दाखल; चाहत्यांनी व्यक्त केली चिंता

मणिरत्नम दिग्दर्शित आगामी 'पोन्नियिन सेल्वन' (Ponniyin Selvan) या चित्रपटात तो महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. याच चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमाला तो संध्याकाळी हजर राहणार होता. मात्र अचानक छातीत दुखू लागल्याने त्याला तातडीने चेन्नईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

Vikram: छातीत दुखू लागल्याने अभिनेता विक्रमला रुग्णालयात केलं दाखल; चाहत्यांनी व्यक्त केली चिंता
Actor Vikram Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jul 08, 2022 | 3:22 PM
Share

तेलुगू, तमिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्ये भूमिका साकारणारा प्रसिद्ध अभिनेता विक्रमला (Vikram) चेन्नईतील कावेरी रुग्णालयात (Kauvery Hospital) दाखल करण्यात आलं. छातीत दुखू लागल्याने विक्रमला आज (शुक्रवार) रुग्णालयात दाखल केलं. मणिरत्नम दिग्दर्शित आगामी ‘पोन्नियिन सेल्वन’ (Ponniyin Selvan) या चित्रपटात तो महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. याच चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमाला तो संध्याकाळी हजर राहणार होता. मात्र अचानक छातीत दुखू लागल्याने त्याला तातडीने चेन्नईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 56 वर्षीय विक्रमने अपरिचित आणि आय यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. केवळ दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नव्हे तर बॉलिवूडमध्येही त्याच्या अभिनयाचे असंख्य चाहते आहेत.

या वर्षात विक्रमचे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. कोब्रा आणि पोन्नियिन सेल्वन: 1 अशी या चित्रपटांची नावं आहेत. त्यापैकी पोन्नियिन सेल्वन या चित्रपटाचा ट्रेलर हा चेन्नईमध्ये लाँच करण्यात येणार आहे. यामध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. चियान विक्रम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्याचं खरं नाव केन्नेडी जॉन व्हिक्टर (केन्नी) असं आहे. त्याने तेलुगू, मल्याळम आणि हिंदी चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. आपल्या दमदार अभिनयासाठी विक्रमला राष्ट्रीय पुरस्कार, सात फिल्मफेअर पुरस्कार, तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार आणि तमिळनाडू सरकारचा कलईमामानी पुरस्कार मिळाले आहेत.

इन्स्टा पोस्ट-

View this post on Instagram

A post shared by Vikram (@the_real_chiyaan)

विक्रमने 1990 मध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली. मात्र 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सेतू’ या चित्रपटामुळे त्याला खरी ओळख मिळाली. या चित्रपटातील भूमिकेसाठी विक्रमने 20 किलो वजन कमी होतं आणि टक्कल केलं होतं. सेतूनंतर त्याने जेमिनी, समुराई, धूल, कढल सदुगुडु, सामी, पितामगन, अरुल, अन्नियन, भीमा, रावणन, इरु मुगन आणि महान यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या पितामगन या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तमिळमधील ‘अन्नियन’ आणि हिंदीतील ‘अपरिचित’ या चित्रपटातील या दुहेरी भूमिका आजही प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात आहेत. यामध्ये त्याने रेमो आणि अंबी अशा दोन भूमिका साकारल्या होत्या. तर रावणन या तमिळ चित्रपटात त्याने ऐश्वर्या रायसोबत काम केलं होतं.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.