AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Fitness Freak Actor : बॉलीवूडमधील ‘फिटनेस फ्रीक’ म्हणून ओळखले जातात हे अभिनेते; स्वतःला फीट ठेवण्यासाठी घेतात अशी मेहनत

इंडस्ट्रीतील काही कलाकार हे त्यांच्या अभियानासोबतच त्यांच्या फिटनेससाठी (Fitness)ओळखले जातात. इंडस्ट्रीतच नव्हे तर चाहत्यांमध्येही  स्टार्स त्यांच्या फिटनेससाठी ओळखले जातात.

Fitness Freak Actor : बॉलीवूडमधील 'फिटनेस फ्रीक' म्हणून ओळखले जातात हे अभिनेते; स्वतःला फीट ठेवण्यासाठी घेतात अशी मेहनत
| Updated on: Sep 13, 2022 | 12:24 PM
Share

बॉलीवूडमधील(bollywood) अनेक कलाकार स्वतःला फीट, तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतात. योगा, जिमबरोबरच योग्य डाएटचेही ते कठोरपणे पालन करतात. बऱ्याचदा त्यांना मिळणाऱ्या भूमिकांनुसारही ते आपल्या तब्येतीमध्ये बदल करत असतात. त्यासाठी जिममध्ये घामही गाळत असतात. चित्रपटांतील(film) भूमिकांसाठी डाएटचेही कठोरपणे पालन करत असतात. यातच या इंडस्ट्रीतील काही कलाकार (actors)हे त्यांच्या अभियानासोबतच त्यांच्या फिटनेससाठी ओळखले जातात. इंडस्ट्रीतचा नव्हे तर चाहत्यांमध्येही अनेक स्टार्स त्यांच्या फिटनेससाठी ओळखले जातात, यामध्ये सर्वात प्रथम नाव येते ते विद्युत जामवालचे

विद्युत जामवाल

बॉलीवूड इंडस्ट्रीत अभिनेता विद्युत जामवाल त्याच्या अभिनयापेक्षा अ‍ॅक्शनसाठी ओळखला जातो. चित्रपटातील त्यांच्या स्टंटबाजीमुळे तरुणांमध्ये त्याची मोठी क्रेझ आहे. हा अभिनेता अवघड स्टंट सहज करताना दिसतो. मात्र या सगळयात तो स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी खूप मेहनत घेतो. वर्कआऊटसोबतच तो त्याच्या डाएटवर विशेष लक्ष देतो. आहाराबाबत विचाराल तर विद्युत शाकाहारी खाण्याचा आग्रह धरतो. शाकाहारी जेवणात अधिक पोषण असते असे त्यांचे मत आहे.

हृतिक रोशन

बॉलीवूडमधील अभिनेता हृतिक रोशन स्वत:ला फिट ठेवण्यासाठी खूप मेहनत घेतो. अभिनयासोबतच त्याच्या फीटनेचेही हजारो चाहते आहे. तो दररोज त्याच्या वर्कआउट रूटीनचे पालन करतो आणि त्याच्या आहाराची देखील विशेष काळजी घेतो. हृतिक प्राधान्याने पार्ट्या आणि ड्रिंक्सपासून दूर राहतो. यासोबतच उच्च प्रथिने आणि कार्बयुक्त आहार घ्या. तो त्याच्या वर्कआउट रूटीनमध्ये वॉर्मअप, स्ट्रेचिंग आणि पुशअप्स फॉलो करतो. यासोबतच तो दर रविवारी योगा करून दिवसाची सुरुवात करतो.

टायगर श्रॉफ

बॉलीवूडमध्ये अल्पावधीच अभिनेता टायगर श्रॉफने स्वतःचे स्थान बळकट केले आहे. बॉडी आणि मार्शल आर्ट्ससाठी टायगरचे अगदी लहानमुलेही चाहते आहेत. स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी  तो कठोर परिश्रमघेत असतो. तो जिममध्ये नियमितपणे वर्कआउट करतो. किकबॉक्सिंग, जिम्नॅस्टिक्स, तायक्वांदो आणि वुशु या व्यायाम प्रकारातही त्याला खूप रस आहे. तो स्वतःला धूम्रपान आणि मद्यपान या दोन्हीपासूनही दूर ठेवतो.

अक्षय कुमार

बॉलिवूडमधील खिलाडी अक्षय कुमार ही त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो.अक्षयकुमार स्वतःला फीट ठेवण्यासाठी कठोर मेहनत घेतो. अक्षय नियमितपणे पहाटे लवकर उठतो. तसेच धावणे, योगा ,यासोबतच तो जिमही करतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अक्षयकुमार कुठल्याही लेटनाईट पार्टी अटेंड करत नाही. तसेच प्राधान्याने शाकाहारी जेवण घेण्यावर अधिक भर देताना दिसून येतो.

जॉन अब्राहम

जॉन अब्राहमही स्वत:ला फिट ठेवण्यासाठी खूप मेहनत घेतो. तो त्याच्या आहार आणि झोपेकडे जास्तीत जास्त लक्ष देतो. जॉन आपल्या आहारात भरपूर प्रोटीन घेतो. फायबरसाठी तो फळे आणि हिरव्या भाज्याही खातो. अभिनेत्याने त्याचे वर्कआउट सत्र दोन भागांमध्ये विभागले आहे, एक प्रमुख आणि एक लहान आहे. यासह, तो अधिक बॉडीबिल्डिंग करतो आणि एका दिवसात त्याच्या शरीराच्या दोन भागांवर काम करतो.

इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.