AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akshara Singh MMS Leak: प्रायव्हेट व्हिडीओ लीकप्रकरणी भडकली अक्षरा सिंह; आकांक्षा दुबेचा उल्लेख करत म्हणाली..

अक्षरा ही फक्त यूपी बिहारमध्येच नाही तर देशभरात प्रसिद्ध आहे. अभिनयासोबतच तिच्या गायनाचेही असंख्य चाहते आहेत. अक्षराची गाणी अनेकदा युट्यूबवर ट्रेंडिंग लिस्टमध्ये असतात.

Akshara Singh MMS Leak: प्रायव्हेट व्हिडीओ लीकप्रकरणी भडकली अक्षरा सिंह; आकांक्षा दुबेचा उल्लेख करत म्हणाली..
Akshara SinghImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 06, 2023 | 9:30 AM
Share

मुंबई : भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह पुन्हा एकदा तिच्या MMS व्हिडीओ लीकप्रकरणी चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर एक एमएमएस क्लिप व्हायरल झाली आहे आणि त्यात भोजपुरी क्वीन अक्षरा सिंह असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. त्यावर आता अक्षराने मौन सोडलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने या लीक व्हिडीओमागील सत्य चाहत्यांसमोर आणलं आहे. अक्षरा सध्या उत्तरप्रदेशमधील बस्ती याठिकाणी आगामी चित्रपटाचं शूटिंग करत आहे. मात्र एमएमएस लीक झाल्याच्या वृत्तामुळे तिचं मन विचलित झालं आहे. 2018 पासून एक गँग माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे, असं अक्षरा या मुलाखतीत म्हणाली.

“मी माझ्या कामाच्या पहिल्या दिवसापासूनच या स्ट्रगलला सामोरं जातेय. आधी असं वाटायचं की, जाऊ दे कायदेशीर बाबींमध्ये कोण अडकणार? मात्र माझं गप्प राहण्याचाच फायदा लोकांनी उचलला आहे. मी यापुढे अशा गोष्टी सहन करणार नाही. जर एखादा युट्यूब ब्लॉगर हे सर्व करत असेल तर मी समजू शकते. कारण पैसे कमावण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. मला मोठ्या वृत्तवाहिन्या आणि माध्यमांशी खरी समस्या आहे. सत्य जाणून न घेता ते अशा बातम्या छापतात आणि त्यामुळेच मला जास्त दु:ख होतं. एका मुलीबद्दल असं लिहिण्याचा हक्क तुम्हाला कोणी दिला”, असा सवाल तिने केला.

काही दिवसांपूर्वीच भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेच्या आत्महत्येनं इंडस्ट्रीत खळबळ उडाली होती. अक्षराने तिचाही उल्लेख यावेळी केली. “2018 पासून माझ्यामागे एक गँग लागली आहे. हे लोक मला काम करू देत नाहीत. मी दुसरी आकांक्षा दुबे बनावी आणि या सर्व गोष्टींना वैतागून मी फाशी घ्यावी अशीच त्यांची इच्छा आहे. मात्र मी अशा गोष्टींनी खचणार नाही”, असं उत्तर तिने दिलं आहे.

याआधीही अक्षराच्या एमएमएस व्हिडीओ लीकची जोरदार चर्चा होती. त्यावेळी प्रतिक्रिया देताना ती म्हणाली होती, “हा कोणीतरी केलेला खूपच घाणेरडा स्टंट आहे. मला त्या गोष्टीची पर्वा नाही. कोणीही काहीही बोलू द्या. तो MMS व्हिडिओ मी अजून पाहिलेला नाही. ज्यांनी तो व्हिडीओ व्हायरल केला त्यांना मला हे विचारायचं आहे की, मी त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे का? अशा कृतीने मी खचून जाणार नाही आणि मला काही फरक पडत नाही.”

अक्षरा ही फक्त यूपी बिहारमध्येच नाही तर देशभरात प्रसिद्ध आहे. अभिनयासोबतच तिच्या गायनाचेही असंख्य चाहते आहेत. अक्षराची गाणी अनेकदा युट्यूबवर ट्रेंडिंग लिस्टमध्ये असतात.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?