AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्याचे मुंबईत अनेक मुलींसोबत…अभिनेत्रीचा करण कुंद्राबाबत खळबळजनक खुलासा? नेमकं काय म्हणाली?

एका प्रसिद्ध अभिनेत्रीने आपल्या एक्स बॉयफ्रेंडबाबत मोठा खुलासा केला आहे. तिने माझ्या एक्स बॉयफ्रेंडचे अनेक मुलींशी अफेअर होतो, असा खळबळजनक दावा केला आहे.

त्याचे मुंबईत अनेक मुलींसोबत...अभिनेत्रीचा करण कुंद्राबाबत खळबळजनक खुलासा? नेमकं काय म्हणाली?
anusha dandekar and karan kundra
| Updated on: Sep 29, 2025 | 8:47 PM
Share

Anusha Dandekar  बॉलिवुड हे असे क्षेत्र आहे, जिथे कधी काय होईल हे सांगता येत नाही. इथं अनेकदा अभिनेता-अभिनेत्री एकमेकांच्या प्रेमात पडतात. अगोदर ते एकमेकांसोबत आयुष्यभर राहण्याची शपथ घेतात. पण नंतर पुढच्याच काही महिन्यांत त्यांचे ब्रेकअप झालेले पाहायला मिळते. करण कुंद्रा आणि अनुषा दांडेकर हे कपलदेखील असेच आहे. या कधीकाळी हे कपल मनोरंजन क्षेत्रात फार प्रसिद्ध होते. नंतर मात्र त्यांचे ब्रेकअप झाले. दरम्यान, आता अनुषा दांडेकरने करण कुंद्राबाबत मोठा खुलासा केला आहे.

मुलाखतीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

अनुषा दांडेकर आणि करण कुंद्रा यांचे ब्रेकअप होऊन बराच काळ लोटला. सध्या करण कुंद्रा तेजस्वी प्रकार या अभिनेत्रीच्या प्रेमात आहे. आता अनुषा दांडेकरने करण कुंद्राबाबत मोठा खुलासा केला आहे. अनुषा दांडेकरच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तिने तिच्या एक्स बॉयफ्रेंडवर भाष्य केलंय. तिने कुठेही करण कुंद्राचे नाव घेतलेले नाही. मात्र ती करणबद्दलच बोलत होती, असे म्हटले जात आहे.

अनुषा दांडेकर नेमकं काय म्हणाली?

एका डेटिंग अॅपने त्यांचा प्रचार करण्यासाठी माझ्याशी संपर्क साधला होता. त्यानंतर या करारात तिने तिच्या बॉयफ्रेंडलाही घेतले. दोघेजण मिळून करारानुसार या डेटिंग अॅपचा प्रचार करायचा, असे ठरले. त्यानंतर माझ्या एक्स बॉयफ्रेंडने अन्य मुलींशी बोलण्यासाठी त्या डेटिंग अॅपचा वापर सुरू केला. त्यानंतर तो मला धोका देत आहे, असे समजून चुकले असे अनुषाने सांगितले आहे. माझ्या एक्स बॉयफ्रेंडचे मुंबईतील अनेक मुलींशी अफेअर होते, असाही खळबळजनक दावा केला आहे.

करण कुंद्र काय प्रतिक्रिया देणार?

दरम्यान, अनुषाने आपल्या या मुलाखतीत एक्स बॉयफ्रेंबडबद्दल बोलताना कोणाचेही थेट नाव घेतलेले नाही. मात्र तिने केलेले वर्णन आणि भाष्यांवरून ती करुण कुंद्राबाबत बोलत असावी, असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळे हा अंदाज खरा असेल तरआता अनुषाच्या दाव्यानंतर करण कुंद्रा काही प्रतिक्रिया देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट समोर! मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी
मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट समोर! मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी न्यायमूर्तींची अचानक बदली, नेमकं काय घडलं?
आमची सत्ता आली तर पक्ष कसे फुटतात ते अमित शाहांना दाखवू
Sanjay Raut | संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा! आमची सत्ता आली तर पक्ष कसे फुटतात ते अमित शाहांना दाखवू
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये! नाशिक-रायगड दौऱ्यानंतर आज मुंबईत मोठी बैठक
MNS Meeting | राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये! नाशिक-रायगड दौऱ्यानंतर आज मुंबईत मोठी बैठक; मनसेत मोठे फेरबदल होणार?
भर मंचावर भाजपच्या बड्या नेत्याची जीभ घसरली; थेट म्हणाले, शुद्ध....
भर मंचावर भाजपच्या बड्या नेत्याची जीभ घसरली; थेट म्हणाला, शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या...
नाटक केलं तर तमाशा दाखवेन! गणेश नाईकांचा नाव न घेता इशारा
Ganesh Naik | नाटक केलं तर तमाशा दाखवेन! गणेश नाईकांचा नाव न घेता इशारा; नेमका निशाणा कुणावर?
मुंबईकरांनो, पाणीकपात तूर्तास कायम! पाऊस ओसरल्याने प्रशासनाचा निर्णय
Mumbai Water Cut | मुंबईकरांनो, पाणीकपात तूर्तास कायम! धरणसाठा 88.70% वर; पाऊस ओसरल्याने प्रशासनाचा मोठा निर्णय
मोठी घडामोड! सुप्रिया सुळे 8 खासदारांसह पंतप्रधान मोदींना भेटणार
मोठी घडामोड! सुप्रिया सुळे 8 खासदारांसह पंतप्रधान मोदींना भेटणार; आज दिल्लीच्या बैठकीत काय निर्णय होणार?
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या...
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान धक्कादायक घटना, व्हिडीओच आला समोर
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर संताप
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्ते  मनोज जरांगेंवर भडकले; सडकून टीका!