आमिर, सलमान,अक्षय कुमारसोबत सुपरहीट चित्रपट दिलेली ही अभिनेत्री इंडस्ट्रीतून गायब; असं जगतेय आयुष्य
आमिर, सलमान, अक्षयसोबत सुपरहिट चित्रपट देणारी अभिनेत्री आता इंडस्ट्रीतून पूर्णपणे गायब आहे. जवळपास सगळेच चित्रपट सुपरहीट देऊनही तिने आज ग्लॅमरच्या दुनियेपासून स्वत:ला दूर ठेवलं आहे. ही अभिनेत्री आता काय करते आणि कुठे असते हे जाणून घेऊयात.

बॉलिवूडमधील अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी पहिल्याच चित्रपटापासून हीट द्यायला सुरुवात केली. प्रसिद्धी, नेम-फेम कमावलं. तसेच प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरल्या पण काही काळाने अचानक इंडस्ट्रीतून गायब झाल्या. अशीच एक अभिनेत्री आहे जिने बॉलिवूडचा पहिलाच चित्रपट हीट दिला आणि रातोरात स्टार झाली. तिने सलमान ते आमिर सर्वांसोबत काम केलं आणि तेही चित्रपट तेवढेच हीट झाले होते.
प्रचंड यश मिळवूनही ही अभिनेत्री अचानक इंडस्ट्रीतून गायब झाली.
प्रचंड यश मिळवूनही ही अभिनेत्री अचानक इंडस्ट्रीतून गायब झाली. कारकिर्दीच्या शिखरावर असतानाच तिने स्वत:ला या ग्लॅमरपासून दूर केलं. ही अभिनेत्री म्हणजे असिन थोट्टुमकल. अभिनेत्री फक्त हिंदीतच नाही तर साउथमध्येही तेवढीच लोकप्रिय आहे. असिनने बॉलिवूडमध्ये सलमान खान, आमिर खान आणि अक्षय कुमार यांच्यासोबत ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. मात्र आज ती इंडस्ट्रीतून पूर्णपणे गायब झाली आहे.
असिन ही सायरो-मलबार कॅथोलिक मल्याळी कुटुंबातून येते. तिचे वडील जोसेफ थोट्टुमकल हे माजी सीबीआय अधिकारी आणि व्यापारी आहेत, तर तिची आई डॉ. सेलिन थोट्टुमकल ही एक सर्जन आहे.
View this post on Instagram
या अभिनेत्रीने एकही फ्लॉप चित्रपट दिला नाही.
वयाच्या 15 व्या वर्षी, असिनने 2001 मध्ये “नरेंद्रन माकन जयकंथन वाका” या मल्याळम चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर ती तेलुगू चित्रपट “अम्मा नन्ना ओ तमिला अम्मयी” आणि तमिळ चित्रपट “एम. कुमारन सन ऑफ महालक्ष्मी” मध्ये दिसली. 2008 मध्ये, असिनने सुपरस्टार आमिर खानसोबत “गजनी” चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, जो त्या काळातील सर्वात मोठ्या हिट चित्रपटांपैकी एक बनला. 2015 पर्यंत तिने एकूण 25 चित्रपटांमध्ये काम केले, त्यानंतर तिने अभिनयातून निवृत्ती घेतली. ती “रेडी”, “हाऊसफुल 2”, “बोल बच्चन”, “खिलाडी 786”, “दशावतारम” आणि “पोक्कीरी” सारख्या चित्रपटांमध्येही दिसली.
सध्या ही अभिनेत्री कुठे आहे आणि काय करतेय?
19 जानेवारी 2016 रोजी असिनने मायक्रोमॅक्सचे सह-संस्थापक राहुल शर्माशी लग्न केले. या अब्जाधीश व्यावसायिकाशी लग्न केल्यानंतर तिने पूर्णपण तिचा वेळ हा फक्त तिच्या वैवाहिक जीवनाला दिला. या जोडप्याला 24 ऑक्टोबर 2017 रोजी अरिन शर्मा नावाची एक सुंदर मुलगी झाली. अक्षय कुमारने या जोडीची ओळख करून दिली होती. लग्नानंतर असिनने चित्रपटांपासून ब्रेक घेतला आणि आता ती तिच्या कुटुंबासोबत राहते.
