अखेर ‘या’ अभिनेत्रीने मान्य केली ती मोठी गोष्ट, म्हणाली पैशांसाठी मी..

| Updated on: Apr 25, 2024 | 2:06 PM

नुकताच दिव्यांका त्रिपाठी हिने मोठा खुलासा केलाय. दिव्यांका त्रिपाठी हिच्या विधानाची आता जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. दिव्यांका त्रिपाठी हिने पैशांसाठी आपण काय केले हे देखील सांगितले आहे. दिव्यांका त्रिपाठी हिने मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवला आहे आणि तिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.

अखेर या अभिनेत्रीने मान्य केली ती मोठी गोष्ट, म्हणाली पैशांसाठी मी..
Divyanka Tripathi
Follow us on

अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी ही नेहमीच चर्चेत असते. आपल्या बिनधास्त स्वभावासाठी दिव्यांका त्रिपाठी ही ओळखली जाते. दिव्यांका त्रिपाठी हिने मालिकांमध्ये हिट भूमिका केला आहेत. दिव्यांका त्रिपाठीपेक्षाही इशिता या नावाने तिला ओळखले जाते. दिव्यांका त्रिपाठी हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. विशेष म्हणजे दिव्यांका त्रिपाठी हिने वेब सीरिजमध्येही काम केले. नुकताच आता दिव्यांका त्रिपाठी हिने मोठा खुलासा केला. आता दिव्यांका त्रिपाठी हिच्या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. दिव्यांका त्रिपाठी ही स्पष्ट बोलताना देखील दिसली आहे.

दिव्यांका त्रिपाठी म्हणाली की, मी अगदी छोट्या वयात काम करण्यास सुरूवात केली. मी बऱ्याच वेळा जास्त पैसा कमवण्यासाठी अधिक काम केले. यामुळे माझ्यावर बऱ्याच वेळा ओझे देखील यायचे. हेच नाही तर पुढे दिव्यांका त्रिपाठी म्हणाली, मुळात म्हणजे कामामुळे मी घरापासून नेहमीच दूर राहिले. यामुळे मला घरच्यांना सोडून राहणे फार जास्त अवघड वाटत नाही.

मुळात म्हणजे मी अगोदरपेक्षा स्वत: मध्ये खूप जास्त बदल केले आहेत. आता मला चांगले आयुष्य जगाचे आहे. हेच नाही तर दिव्यांका त्रिपाठी म्हणाली, अधिक पैशांसाठी कामाचे अधिक ओझे घेण्यापेक्षा मी आता नात्यांना अधिक महत्व देत आहे. बऱ्याच वेळा काही गोष्टी करण्यासाठी मला भाग पाडले जाते. परंतू आता आपण त्यामध्ये बदल केले आहेत.

आता मी कोणतीही भूमिका करण्याच्या अगोदर विचार करते. मला जर एखादी भूमिका आवडत नसेल तर मी त्याला होकार देत नाही. मला माझ्या कामासोबत आता आत्म-सम्मान पााहिजे आहे, अशी कोणतीही भूमिका ज्यामध्ये मला कमजोर बनवेल, अशी भूमिका करणार नसल्याचे देखील सांगताना दिव्यांका त्रिपाठी ही दिसली आहे.

‘अदृश्यम’ वेब सीरिजमध्ये धमाकेदार भूमिका करताना दिव्यांका त्रिपाठी दिसली. आता नुकताच दिव्यांका त्रिपाठी हिने केलेल्या विधानाची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. दिव्यांका त्रिपाठी हिने स्पष्ट केले की, ती आता कशाप्रकारच्या भूमिका करणार आणि कशाप्रकारच्या नाही ते. दिव्यांका त्रिपाठी हिने अगदी कमी वयात पैशांसाठी काम करण्यास सुरूवात केल्याचे देखील तिने म्हटले आहे.