AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्टेडियमच्या टॉयलेटमध्ये अभिनेत्रीसोबत नको ते घडलं, चुकून मैत्रिणीलाच…

एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत स्टेडियममध्ये भयंकर प्रकार घडला आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झालेल्या अभिनेत्रीला याबाबत माहिती मिळाली. आता नेमकं काय घडलं चला जाणून घेऊया...

स्टेडियमच्या टॉयलेटमध्ये अभिनेत्रीसोबत नको ते घडलं, चुकून मैत्रिणीलाच...
ActressImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Feb 18, 2026 | 3:34 PM
Share

महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा कोणत्याही क्षेत्रात असो, तो नेहमीच गंभीर राहतो. विशेषतः कलाकारांच्या बाबतीत हा संघर्ष वेगळाच असतो. अनेकदा शूटिंग किंवा कार्यक्रमांसाठी अशा ठिकाणी जावे लागते जिथे पुरेशा सोयी-सुविधा नसतात. मात्र मोठ्या कार्यक्रमांमध्ये कलाकारांसाठी विशेष व्यवस्था केली जाते, तरीही सुरक्षिततेची हमी मिळत नाही. अशाच एका धक्कादायक घटनेत एका प्रसिद्ध अभिनेत्रीला सामोरे जावे लागले.

नेमकं काय घडलं?

३२ वर्षीय या अभिनेत्रीने (नाव उघड झालेले नाही) बंगळुरूतील कोरमंगला इनडोअर स्टेडियममध्ये घडलेल्या घटनेची तक्रार सायबर क्राइम पोलिसांकडे दाखल केली आहे. ही घटना फेब्रुवारी २०२६ मध्ये ‘सेलिब्रिटी विमेन क्रिकेट टूर्नामेंट’ (Celebrity Women Cricket Tournament) दरम्यान घडली. एफआयआरनुसार, ६ ते ८ फेब्रुवारी दरम्यान आयोजित या तीन दिवसीय कार्यक्रमात ७ फेब्रुवारीला अभिनेत्री या स्टेडियममध्ये गेली होती. तिथे तिचा महिलांच्या टॉयलेटचा वापरताना एका अज्ञात व्यक्तीने व्हिडीओ शूट केला. हा अश्लील आणि असभ्य व्हिडीओ गुपचूप शूट करण्यात आला.

चुकून मैत्रिणीला पाठवला व्हिडीओ

कन्नड टेलिव्हिजन अभिनेत्रीला घटनेची तत्काळ कल्पना आली नव्हती. काही दिवसांनंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची माहिती तिला मिळाली. आरोपीने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरून एका अकाउंटवरून दुसऱ्या अकाउंटवर पाठवला होता. मात्र, आरोपीला चुकून ते अकाउंट अभिनेत्रीच्या मैत्रिणीचे आहे हे कळले नाही आणि त्याने ते अभिनेत्रीचे स्वतःचे अकाउंट समजून पाठवले. मैत्रिणीने हा व्हिडीओ पाहताच ताबडतोब अभिनेत्रीला सांगितले.

आरोपी विरोधात तक्रार

यानंतर ब्लॅकमेलिंगला सुरुवात झाली. आरोपीने अभिनेत्रीशी संपर्क साधून तिचे आणखी खासगी व्हिडीओ असल्याचा दावा केला. पैसे न दिल्यास हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून तिची बदनामी केली जाईल, अशी धमकी दिली. तसेच खासगी व्हिडीओ कॉलची मागणीही केली. या संपूर्ण प्रकाराने हादरलेल्या अभिनेत्रीने १३ फेब्रुवारीला सायबर क्राइम पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी आयटी कायद्याच्या संबंधित कलमांसह IPC च्या कलम ७७ (व्हॉयरिझम), ३५१ (गुन्हेगारी धमकी) आणि ३०८ (एक्स्टॉर्शन) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सायबर क्राइम पथक आता इन्स्टाग्राम अकाउंटचा माग काढणे, व्हिडीओ कुठून शूट झाला, आरोपीची ओळख पटवणे यासह तपास करत आहे.

Follow Us
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चे सुरुच1.
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर, बिहारला सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी मदत क्रमांक जारी
नेपाळमध्ये महापूर; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महापुरात एक हजारहून अधिक बेपत्ता; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला विरोध!
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला मुळशीकरांचा तीव्र विरोध
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न
प्रसाद लाड पुन्हा मनोज जरांगे पाटलांशी संवाद साधणार