Big News : ‘गंदी बात’ फेम अभिनेत्री गहना वशिष्ठला अटक, अश्लिल व्हीडिओ शेअर केल्याचा आरोप

गहनाला आज मुंबई कोर्टात हजर करण्यात येणार असून तिची चौकशीही होणार आहे अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

Big News : ‘गंदी बात’ फेम अभिनेत्री गहना वशिष्ठला अटक, अश्लिल व्हीडिओ शेअर केल्याचा आरोप

मुंबई : टीव्ही अभिनेत्री गहना वशिष्ठाला मुंबई क्राइम ब्रँचच्या (Mumbai Crime Branch) प्रॉपर्टी सेलने अटक केली असल्याची माहिती समोर येत आहे. तिने तिच्या वेबसाईटवर एक अडल्ट व्हीडिओ शूटिंग शेअर केल्याप्रकरणी तिला अटक करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. गहनाला आज मुंबई कोर्टात हजर करण्यात येणार असून तिची चौकशीही होणार आहे अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतर मॉडेल्स, साइड अभिनेत्री आणि काही प्रॉडक्शन हाऊसवरही पोलीस करडी नजर ठेवून आहेत. (actress gehana vashisth arrest by mumbai police for uploading adult content)

मिस आशिया बिकिनीचा ताज जिंकणाऱ्या गहना हिने हिंदी, तेलगू सिनेमांमध्ये आणि अनेक जाहिरातींमध्ये काम केलं आहे. या प्रकरणात एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गहनाने 87 अश्लील व्हीडिओ आणि पॉर्न व्हीडिओ शूट केले आहेत आणि ते तिच्या वेबसाईटवर अपलोड केले आहेत. या चॅनेलची सदस्यता घेतलेल्या लोकांना 2 हजार रुपये हे व्हीडिओ पाहण्यासाठी द्यावे लागतात.

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित वेबसाईटविरोधात तीन जणांनी तक्रारही दाखल केली होती. यामध्ये त्यांच्याकडून जबरदस्तीने अश्लील शूट करवून घेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. गुरुवारी गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने मालाडमधील मड बेटावरील ग्रीन पार्क बंगल्यावर छापा टाकला होता. या छाप्यात पोलिसांनी यासमीन बेग खान, प्रतिभा नलावडे, मोनू गोपालदास जोशी, भानुसूर्यम ठाकूर आणि मोहम्मद आसिफ यांना अटक केली आहे.

सिनेमा शूटिंगच्या नावाखाली मड बेटावर काही खासगी बंगल्यांमध्ये वेश्या व्यवसाय आणि शॉर्ट पॉर्न व्हीडिओ शूट होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर मोठी हुशारीने पोलिसांनी या बंगल्यांवर छापे टाकले. काही टोळ्या तरुण मुलींना सिनेमात मोठं काम देतो असं सांगून अश्लील व्हिडिओंमध्ये काम करून घेत होत्या. या रॅकेटमधून पोलिसांनी दोन मुलींची सुटका केली ज्यांना नशामुक्ती केंद्रामध्ये पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. (actress gehana vashisth arrest by mumbai police for uploading adult content)

संबंधित बातम्या – 

Special story: बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये लोकप्रिय असणारा छोटू पांडे आहे तरी कोण?

लाखो रुपये अॅडव्हान्स घेऊन सनी लिओनीची कार्यक्रमाला दांडी

Bigg Boss 14 | दिशा पटानीसोबत सलमान खानने केला ‘स्लो मोशन में’ गाण्यावर डान्स!

(actress gehana vashisth arrest by mumbai police for uploading adult content)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI