AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Girija Oak : तीन चार दिवस तो फोन… नॅशनल क्रश गिरीजा ओकने पहिल्यांदाच आईसमोर सांगितली ती गोष्ट

गिरीजा ओक आणि तिच्या आईमधील अतूट नातेसंबंध या लेखात उलगडले आहेत. कामाच्या व्यापातही आईशी संवाद साधण्याचे महत्त्व, दोन-तीन दिवसांच्या न बोलण्यानंतरची ओढ आणि लाडक्या नावाने आईला हाक मारणे, हे सर्व गिरीजाने एका मुलाखतीत शेअर केले. तिच्या आईच्या दुसऱ्या लग्नाबद्दलही तिने मोकळेपणाने सांगितले.

Girija Oak : तीन चार दिवस तो फोन... नॅशनल क्रश गिरीजा ओकने पहिल्यांदाच आईसमोर सांगितली ती गोष्ट
गिरीजा ओक
| Updated on: Jan 06, 2026 | 12:58 PM
Share

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी… कवी यशवंत यांची ही कविता आयुष्यात एकदा तरी आपल्यापैकी बहुतेकांनी वाचली, ऐकली असेलच. आई आणि मुलांचं एक खासं नातं असतं, मुलींचं तर आईशी बाँडिंग वेगळंच असतं. पण काळाच्या ओघा, मोठं होऊ लागतो, तसं आईशी बोलणं, शेअरिंग कमी होतं. कामासाछी बाहेर पडल्यावर, लग्न झाल्यावर तर आई-मुलींचं बोलणंही खूप अंतराने होतं. मात्र एक वेळ अशी येतेच की आईशी काहीही शेअर केल्याशिवाय चैनच पडत नाही.

तुम्हा-आम्हा सर्वांना जसं वाटतं तसंच नातं सेलिब्रिटींचं त्यांच्या आईशी असतंच. निळी साडी आणि पांढरा ब्लाऊज घालून टॉक शो मध्ये आलेली गिरीजा ओक बघता बघता नॅशनल क्रश बनली. तिचे लाखो फॅन्स झालेत आणि अजूनही तिची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा असते. वैयक्तिक आयुष्यात गिरीजा (Girija Oak)कशी असते, काय काय करते, तिचं आईशी नातं कसं आहे, हे नुकतंच एका मुलाखतीतून समोर आलं आहे.

एका कॉलने कळते खुशाली

‘दिल के करीब’ या कार्यक्रमात गिरीजाने आईसोबत हजेरी लावली. तिचे बरेच व्हिडीओ व्हायरल झाले होते, त्यामध्ये ती तिच्या आईच्या दुसऱ्या लग्नाबद्दल, त्या प्रवासाबद्दल अगदी मोकळेपणे बोलली होती. आता त्याच मुलाखतीतला आणखी एक व्हिडीओ समोर आला असून तिचं आणि तिच्या आईचं नातं, त्यांचा बाँड त्यात स्पष्ट दिसतो. कधीकधी आईशी 2-3 दिवस बोलणं होतं नाही, तेव्हा कसं फीलिंग असतं, याबद्दलही गिरीजाने अगदी प्रांजळपणे सांगितलंय.

काही जणांचं मी पाहिलं हं, आता वेळ आहे हं माझ्या लेकीचा फोन यायची, असं किती तरी आया आणि लेकी लग्न झाल्यावर म्हणतात, असं गिरीजीची आई म्हणाली. दिवसभरात तिचं (गिरीजाचं) फक्त हॅलो ऐकलं ना तरी मला कळतं ती बरी आहे की नाही. तिच्या हॅलोमुळे दिलासा मिळतो, तिचा आवाज ऐकला तरी ते पुरेसं असतं मला असं तिच्या आईने नमूद केलं.

 Girija Oak : आईचं दुसरं लग्न झाल्यावर – गिरीजा ओक पहिल्यांदाच झाली व्यक्त

आई रुसल्ये का माझ्यावर ?

त्यावर गिरीजानेही प्रतिक्रिया देत त्यांच्या नात्याबद्दल सांगितलं. ” आईशी बोलणं होतंच नेहमी, फारफार तर कधीतरी दोन-तीन दिवस गॅप असतो, त्यापेक्षा जास्त नाहीच. दोन किंवा तीन दिवस मधे गेले की पुढचा आईचा फोन मला जेव्हा येतो. तेव्हा मी सर्व आजूबाजूच्या लोकांना सांगते, आता मात्र मला 15-20 मिनिटं द्या. कारण आता ते सर्व बॅक अप झालंय, बॅक लॉग असतो गप्पाचा तो भरून काढायचा असतो, ” असं गिरीजाने सांगितलं.

” तिच्या (आई) पहिल्या हाक मारण्यातच मला कळलेलं असतं की आता पुढची 20 मिनिटं हे सगळं शांतपणे ऐकून घ्यायचं आहे. तिने गिरीजा sssss असा एक आवाज दिला की मलाही कळतं तिला काय म्हणायचं ते. पण तिने दोन तीन दिवस फोन नाही केला, किंवा माझा फोन नाही झाला तिला, किंवा मी बिझी असेन म्हणून बोलणं नाही झालं तर मग तिसऱ्या दिवशी मला चुकल्या चुकल्यासारखं वाटतं. आईचा आज फोन नाही आला. रुसलीय का माझ्यावर ? असं मला वाटू लागतं”, असं म्हणत गिरीजाने आईशी बोलणं किती सुखकारक, दिलासादायक असतं ते सांगितलं.

आईला लाडाने काय हाक मारते गिरीजा ?

यावेळी आईला लाडाने काय हाक मारते ते गुपितही गिरीजाने सांगितलं. तिचं घरातील नाव बाबी आहे, म्हणजे माहेरचं. मी तिला कधीकधी प्रेमाने गट्टू म्हणते..  मग बरेच दिवस आमचा फोन, बोलणं झालं नाही की मीच करते तिला फोन आणि विचारते, काय मग बाबी काय चाललंय? असं म्हणत गिरीजाने आईसोबतचं प्रेमळ नातं कसं आहे तेही शेअर केलं. तिच्या या व्हिडीओवर , मनमोकळ्या अंदाजावर हजारो लाईक्स आलेत. तिचं आणि आईचं नातं लोकांना खूप आवडलं आहे.

... ते मुंबईत जन्मल्यावर समजेल; राज ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना
... ते मुंबईत जन्मल्यावर समजेल; राज ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना.
आमदार फोडायला 200 कोटी 2 हजार कोटी कर्ज काढून आणले? राज ठाकरेंचा दावा
आमदार फोडायला 200 कोटी 2 हजार कोटी कर्ज काढून आणले? राज ठाकरेंचा दावा.
राजकारणातील पैशांचा ड्रग्सशी संबंध? राज ठाकरेंनी केला खळबळजनक दावा
राजकारणातील पैशांचा ड्रग्सशी संबंध? राज ठाकरेंनी केला खळबळजनक दावा.
मुंबईकर म्हणून मला लाज वाटते! महेश मांजरेकरांनी केलं मोठं विधान
मुंबईकर म्हणून मला लाज वाटते! महेश मांजरेकरांनी केलं मोठं विधान.
ससाने जागा अदानीच्या तोंडात घालतायत! उद्धव ठाकरेची सरकारवर टीका
ससाने जागा अदानीच्या तोंडात घालतायत! उद्धव ठाकरेची सरकारवर टीका.
मराठी माणूस एकत्र येऊ नये यासाठी राजकारण सुरू - राज ठाकरे
मराठी माणूस एकत्र येऊ नये यासाठी राजकारण सुरू - राज ठाकरे.
महाराष्ट्राला 20 वर्ष वाट का पहावी लागली ? काय म्हणाले ठाकरे बंधू ?
महाराष्ट्राला 20 वर्ष वाट का पहावी लागली ? काय म्हणाले ठाकरे बंधू ?.
6 पती-पत्नी निवडणुकीच्या रिंगणात, सांगली पालिकेच्या निवडणुकीची चर्चा!
6 पती-पत्नी निवडणुकीच्या रिंगणात, सांगली पालिकेच्या निवडणुकीची चर्चा!.
...त्याचाच राग उद्धव ठाकरे यांनी धरला अन्.. संतोष धुरी यांचा नवा आरोप
...त्याचाच राग उद्धव ठाकरे यांनी धरला अन्.. संतोष धुरी यांचा नवा आरोप.
लातूरमध्ये फडणवीसांचे डॅमेज कंट्रोल, देशमुखांच्या योगदानाला सलाम अन्..
लातूरमध्ये फडणवीसांचे डॅमेज कंट्रोल, देशमुखांच्या योगदानाला सलाम अन्...